को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी नोंदणीबाबत हरकती आमंत्रीत

27

✒️नरेश निकुरे(कार्यकारी संपादक)मो:-9823594805

चंद्रपूर(दि.13नोव्हेंबर):-सहकारी संस्था चंद्रपूरचे सहाय्यक निबंधक यांचे कार्यालयात नियोजीत इन्फिनिटी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी नोंदणीबाबत प्रस्ताव प्राप्त झाला आहे.

चंद्रपूर तालुक्यातील नागरी, ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्थांना सदरहु संस्थेच्या नोंदणीबाबत हरकती असल्यास त्यांनी 27 नोंव्हेंबर 2020 पुर्वी सादर कराव्यात किंवा दि. 27 नोव्हेंबर रोजी दु. 12 वाजता सुनावणीचे वेळी सदर हरकती दाखल कराव्यात.

कार्यालयास हरकती प्राप्‍ न झाल्यास किंवा सुनावणीला हजर न झाल्यास संबंधीतांना काहीही म्हणावयाचे नाही, असे गृहीत धरून पुढील कार्यवाही करण्यात येईल असे सहाय्यक निबंधक चंद्रपूर यांनी कळवीले आहे.