शेवराई सेवाभावी संस्थाचे काम कौतुकास्पद – पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डाॅ अभिनव देशमुख

38

✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पूण(दि.14नोव्हेंबर):-सारे आयुष्य अनिष्ट रुढी परंपराची घोंगडी पांघरून घेतलेल्या व शिक्षणा पासून वंचित राहिलेल्या आदिवासी लोकांना गाव व्यवस्थेत न्याय मिळवून देण्याचे काम साहित्यिक.आदिवासी समाजसेवक,नामदेव भोसले हे शेवराई सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून काम करत आहे, अशा शब्दात पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक मा. श्री.डाॅ अभिनव देशमुख साहेब यांनी व्यक्त केले, नामदेव भोसले हे आदिवासी कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी व मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी अग्रेसर राहिले आहे.

भोसले यांनी कोरोनाच्या काळात पुणे जिल्ह्यातील विवीध भागांमध्ये वाड्या ,वस्ती मध्ये काम करुन शासनाला निस्वार्थपणे मदत केली आहे.प्रत्येक आदिवासी तांड्यावर जाऊन या गरीब पिढीत लोकांनमध्ये शासनाच्या विविध योजना विषयी जणजागृती करुन त्यांना रोजंदारी निर्माण करुन देणे व त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून दर वर्षी दिडशे ते दोनशे मुलांच्या शिक्षणाचा खर्च हा शेवराई सेवाभावी संस्था करत आहे, आज पोलिस आणि पारधी यांच्यातील कलंकित दरी कमी करुन एक मैत्रीचे नाते तयार करण्यात यश आले आहे.

आज आदिवासी पारधी समाजातील बांधवांची परस्थीती ही अतीशय हालाखिची आहे. तसे म्हटले तर राज्यातील विविध ठिकाणी काम करत असताना पिढीत लोकांवर अन्याय करणा-यावर कडक कारवाई केली आहे. तसेच या पुढे देखिल मी जिल्हामध्ये कायद्याचे उल्लंघन करणा-या लोकांवर कडक कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले. मा.डाॅ. अभिनव देशमुख साहेब यांना आदिवासी समाजसेवक व साहित्यिक,नामदेव भोसले यांचे लिखीत “मराशी, व “ये हाल ,हे पुस्तक भेट देऊन स्वागत केले.

व आदिवासी पारधी समाजाच्या वतीने गरीब. पिढीत ,वंचित, कुटुंबावर होणारे अन्याय व खब-याकडून खोटी माहिती घेऊन तरुणांनवर नहाक शंषयीत रुपी नाहक गुन्हे दाखल करुन तुरुंगात टाकले जाते ते कुठेतरी थांबावे, असे शेवराई सेवाभावी संस्था च्या माध्यमातून अध्यक्ष व आदिवासी ,समाजसेवक, नामदेव भोसले,यांच्या कडून अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी सुनिल भोसले संपादक तथा उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य आखिल भारतीय चित्रपट निर्माता महामंडळ ,निलेश चांदगुडे संतोष भोसले, बलवर पवार, कुणाल भोसले. सचिन राऊत. हे उपस्थितीत होते.