तुकूम(ति.)ता. नागभीड़ जिल्हा चंद्रपुर येथे क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंती संपन्न

60

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी ( दि.15 नोव्हेंबर):- नागभीड तालुक्यातील तुकूम(ति.) येथे क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंती संपन्न झाली.आदिवशी माना जमत विद्यार्थी युवा संघटना व आइकॉन बहुद्देशीय संस्था तुकुम यांच्या वतीने शहिद क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला गेला. या कार्यक्रमाची सुरूवात प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून करण्यात आली, प्रतिमेचे दीपप्रज्वलन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन श्री. मुखरूजी दोहीतरे (अध्यक्ष माना समाज तुकूम),प्रमुख मार्गदर्शक म्हणून
श्री. विलासजी गजभे सर (कर्मवीर विद्या.नागभीड)तथा
श्री. पवनजी माटे सर (अध्यक्ष आँयकाँन फाऊंडेशन तुकुम
प्रमुख मार्गदर्शक गजभे सर् यानी बिरसा मुंडा यांच्या विषयी प्राथमिक माहिती सांगितली तर पवन माटे सरांनी बिरसा मुंडा हे “गांधीके पहिले गांधी” ही संकल्पना तसेच” उलगुलान” क्रांति या विषयी सखोलपणे समजावून सांगितले.

या कार्यक्रमा करिता प्रमुख अतिथी म्हणूनश्री. रामुभाऊ गरमळे (सैनिक),धनराज दोहीतरे(पो.पा.तुकूम),अशोकजी सावसाकडे (सचिव मा.स.तुकूम), बालाजी चौधरी (शिक्षक), अतुलजी वाकडे (शिक्षक), दिलिपजी गायकवाड (शिक्षक), वैभवजी गजभे (SRPF), बाबुरावजी गजभे,रघुनाथजी श्रीरामे, प्रकाशजी गजभे, सचिनजी गरमळे,रविंद्रजी गजभे,तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक युवा वर्ग व मोठ्या प्रमाणात प्रेक्षक उपस्थित होते,या कार्यक्रमाचे प्रस्ताविक वैभव श्रीरामे, सूत्रसंचालन परमहंस चौके यांनी केले तर आभार पूजा श्रीरामे यांनी मानले .