ट्रेलर चोरी प्रकरणात ४० लाखांचा मुद्देमाल हिंगणघाट पोलिसांनी केला हस्तगत

37

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि.१५नोव्हेबर):-नजीकच्या रिमडोह शिवारातील पी एम पी ट्रान्सपोर्ट कंपनीच्या डेपोतून चोरीस गेलेल्या दोन ट्रेलर प्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी यापुर्वीच आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांच्या कोठडीत तपासादरम्यान दिलेल्या माहितीवरुन हिंगणघाट ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक दिपेश ठाकरे यांचे पथकाने मुंबई येथून आरोपींना मुद्देमालासह अटक केली.सुमारे ४० लक्ष रुपये किमतीचे पीएमपी कंपनीचे दोन ट्रेलर चोरट्यांनी चोरी केल्याची तक्रार दि.७ रोजी ट्रांसपोर्टमालक प्रवीण पटेलिया यांनी हिंगणघाट पोलिसांत दाखल केली होती.

पोलिसांनी याप्रकरणी पीएमपीच्या चार कर्मचाऱ्यांना नागपुर-अमरावती मार्गावरुन अटक करीत दि.९ रोजी अटक केली होती,त्यावेळी चोरी केलेले दोन ट्रेलर पोलिसांनी जप्त करुन ट्रांसपोर्टमालक पटेलिया यांना मिळवून दिले आहेत.परंतु आरोपींनी यादरम्यान उपरोक्त वाहनांचे सुमारे चार लक्ष रूपये किंमतीचे टायर्स डोंबीवली मुंबई येथील इसमास विकले होते.
पोलिस उपनिरीक्षक दिपेश ठाकरे व त्यांचे चमुने परवा मुंबई येथे जाऊन ते २४ टायर्स हस्तगत केले आहे. त्यामुळे आता सदर व सर्व ४० लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

पीएमपी ट्रांसपोर्ट कंपनीत काम करणाऱ्या आरोपींनी सदर दोन्ही ट्रेलरच्या टायर्सची नागपुर येथे विक्री केल्यानंतर तेथून हे टायर्स मुंबई येथे पळविण्यात आले होते.ज्या वाहनाने टायर्स मुंबई येथे पाठविन्यात आले त्याचे चालक तसेच सदरची दोन वाहनेसुद्धा आता ताब्यात घेण्यात आले आहे.सदर टायर्स मुंबई येथे घेऊन जाणाऱ्या ट्रेलर्स व चालक यांचेसह आरोपींना ताब्यात घेत आज हिंगणघाट न्यायालयापुढे हजर केले.सदर आरोपींची येत्या १७ पर्यंत न्यायालयाने पोलिस कोठड़ी मंजूर केला.

चोरी गेलेले दोन्ही ट्रेलर मिळाले असून मात्र संबंधित ट्रेलरचे ८ लाख किमतीचे २४ टायर अजूनही मिळाले नाही.
शहरानजीकच्या नागपुर जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील रिमडोह परिसरातील प्रवीण पटेलिया यांच्या पीएमपी कंपनीचे डेपोचे आवारातून एमएच- ३२ क्यू ५६५१ एमएच ३२ क्यू ३५५१ क्रमांकाचे उभे करून ठेवलेल्या दोन ट्रेलरची(सीमेंट बलकर) चोरी झाल्याची तक्रार ट्रांसपोर्ट कंपनी मालक प्रवीण पटेलिया यांनी हिंगणघाट पोलिसांत दि.७ रोजी करण्यात आली होती, यावेळी तेथे ड्यूटीवर तैनात असलेल्या सुरक्षारक्षकाने दोन ट्रक चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांने यासंदर्भात पटेलिया यांना माहिती दिली.

शोध घेतल्यानंतरसुद्धा दोन्ही ट्रेलर्स आढळून न आल्याने अखेर या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. सदर गुन्हे क्र.६००/२०२० प्रकरणी पोलिसांनी मुळचे उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेल्या चार आरोपीस संबंधित प्रकरणी अटक केली होती.उपरोक्त प्रकरणी आरोपींनी सदर ट्रेलरचे टायर्स पनवेल मुंबई येथे मुळचे उत्तर प्रदेशातील रहिवासी विजय शंकर वर्मा(४२) तसेच भोला चौथी विश्वकर्मा(४१) यांना टायर्स तसेच दोन ट्रेलर एनएल ०१-एड़ी-९०७० तसेच पीबी-०६-वी-९९७० असे मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले.

सदर प्रकरणी पोलिस अधिक्षक प्रशांत होळकर, डिवाएसपी टेळे,पोलिस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक दिपेश ठाकरे,पोहवा प्रशांत भाईमारे,शेखर डोंगरे,रमेश सोनेकर सचिन घेवन्दे,नीलेश तेलरांधे,विशाल बंगाले,भारशंकर चमु यांनी कारवाई केली.