गडचिरोली जिल्ह्यात एका मृत्यूसह आज (16 नोव्हेंबर) 71 कोरोनामुक्त तर 29 नवीन कोरोना बाधित

    42

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

    गडचिरोली(दि.16नोव्हेंबर):- आज जिल्हयात 29 नवीन बाधित आढळून आले. तर आज 71 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 6918पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 6388 वर पोहचली. तसेच सद्या 460 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 70 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. नवीन मृत्यू यामध्ये अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील 47 वर्षीय महिलेचा समावेश आहे. आज जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.34 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 6.65 टक्के तर मृत्यू दर 1.01 टक्के झाला.

    नवीन 29 बाधितांमध्ये गडचिरोली 19, अहेरी 05, आरमोरी 0, भामरागड 2, चामोर्शी 1, धानोरा 0, एटापल्ली 0, कोरची 0, कुरखेडा 1, मुलचेरा 0, वडसा 0 व सिरोंचा येथील 1 जणांचा समावेश आहे. आज कोरोनामुक्त झालेल्या 71 रूग्णांमध्ये गडचिरोली 32, अहेरी 12, आरमोरी 5, भामरागड 0, चामोर्शी 03, धानोरा 1, एटापल्ली 3, मुलचेरा 3, सिरोंचा 6, कोरची 1, कुरखेडा 3 व वडसा मधील 2 जणाचा समावेश आहे.

    नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील चुरचुरा 1 , सोनापूर कॉम्पलेक्स 5, कारमेल स्कूल 3, नवेगाव 1, राधे बील्डींग 1, गोकूल नगर 2, लांझेडा 1, रामनगर 1, सर्वोदय वार्ड 1, आर्शीवाद नगर 1,कॉम्प एरिया 1, गणेश कॉलनी 1 अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये आलापल्ली 4 , एटापल्ली 1, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये 0, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 2, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये वायगाव 1, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये 0, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये 0, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये 0, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 0, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, तसेच वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 0, असा समावेश आहे.