प्रोत्साहनपर पन्नास हजाराची रक्कम खात्यात जमा करा

    44

    ?शेतकऱ्यांची मागणी

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

    ब्रम्हपुरी(दि.18नोव्हेंबर):- सरकारने नेहमीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये जमा करण्यात येईल असे जाहीर केले होते. मात्र आज एक महीने लोटून गेले तरीपण प्रोत्साहनपर रक्कम जमा केली नाही. ती रक्कम लवकरात लवकर जमा करावी अशी मागणी ब्रह्मपुरी तालुक्यातील शेतकर्‍यांनी केली आहे.
    सरकारने दोन लाख रुपये कर्जमाफी दिली. तेव्हाच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. परंतु आज पर्यंत बरेच महिने लोटले गेले मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात शंका निर्माण झाली आहे.

    शासनाने तातडीने 50 हजार रुपये प्रोत्साहनपर राशी खात्यावर जमा करावी अशी मागणी कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनी केली आहे. यंदा ब्रह्मपुरी तालुक्यातील अनेक गावात गोसेखुर्दच्या धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे गंगा नदीला महापूर आला. त्यात नदीकाठच्या गावांना चांगलाच फटका बसला आहे. एवढेच नव्हे तर तूळतुळा या रोगाने थैमान घातल्यामुळे हातात आलेला पिक पूर्णपणे नष्ट झाला आहे. अनेकांची घरे कोसळली बरेच लोक रस्त्यावर आले आहेत.

    बऱ्याच शेतकऱ्यांना धान पिक खूप कमी आल्यामुळे त्यांच्यासमोर मोठा संकट निर्माण झाले आहे. अशा शेतकऱ्यांना शासनाने प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये देण्याचे सांगितले होते. त्यांना मदत अद्याप ही मिळाली नाही. प्रोत्साहनपर मदतीची प्रतीक्षा आहे. त्यामुळे शासनाने तातडीने लक्षपूर्वक शेतकऱ्यांची आर्थिक मदत करावी, अशी सर्व शेतकरी बांधवांची मागणी आहे.