माखणी येथे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनची कोरोना चाचणी

    41

    ✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

    गंगाखेड(दि.21नोव्हेंबर):- मागील काही दिवसापासुन कोरोना हा संसर्ग कमी झाला त्यामुळे राज्यसरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार पहील्या टप्यात नववी ते दहावी ११व बारावी चे वर्ग २३नोव्हेबर पासुन सुरू होत आहेत. मात्र शाळा उघडण्यापुर्वी खबरदारी म्हणून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी बंधन कारक करण्यात आली.

    असुन गंगाखेड तालुक्यातील ज्ञानज्योत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय डोंगरजवळा ता गंगाखेड या विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची यांची कोरोना RT-PCR टेस्ट करण्यात आली.

    यावेळी टेस्ट करतांना आरोग्य कर्मचारी वैजनाथराव पाळवदे वर्षा मुंडे विशाखा भालेराव व सौ. लाड एच बी यांनी कर्मचाऱ्यांच्या चांगल्या प्रकारे टेस्ट केल्या बद्दल अध्यक्ष पप्पुदादा घरजाळे आदर्श इग्लिश स्कुल गंगाखेड प्राचार्य भरत घरजाळे व कर्मचारी यांनी सर्व आरोग्य कर्मचारी यांचे आभार मानले.