पदवीधर, शिक्षकांचे प्रश्न मांडण्यासाठी संदीप जोशी यांना विधानपरिषदेत पाठवा – खा.रामदास तडस

27

🔸वर्धा शहरासह सेलू, हिंगणघाट येथे संदीप जोशी यांचा प्रचार दौरा

✒️वर्धा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

वर्धा(दि.21नोव्हेंबर):-प्रश्न, शिक्षकांच्या समस्या व त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी भाजपा व मित्रपक्षाचे उमेदवार संदीप जोशी यांना विजयी करून विधानपरिषदेत पाठवा, असे आवाहन वर्धा लोकसभा क्षेत्राचे खासदार रामदास तडस यांनी केले. नागपूर पदवीधर मतदार संघाचे भाजप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ), बहुजन रिपब्लिकन एकता मंच व खोरिप महायुतीचे अधिकृत उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारार्थ वर्धा येथे झालेल्या पदवीधर मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी संदीप जोशी यांच्यासह खासदार रामदास तडस, आमदार डॉ.पंकज भोयर, वर्धा भाजपा जिल्हा अध्यक्ष शिरिष गोडे, संघटन महामंत्री अविनाश देव, प्रदेश सचिव राजेश बकाने, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस सुधीर दिवे, चार्टड अकाऊंटंट अभिजीत देशपांडे प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना खासदार रामदास तडस म्हणाले, पदवीधरांच्या बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. याव्यतिरिक्त शिक्षकांच्या पेशन्सचा प्रश्न असो वा त्यांच्या भरतीची समस्या असो, त्या कायदेमंडळात मांडण्यासाठी आपला हक्काचा माणूस पाहिजे.
आपल्याला संदीप जोशी यांच्या रूपाने हक्काचा माणूस मिळण्याची संधी चालून आली आहे. संदीप जोशी हे युवा मोर्चापासून संघटनचे काम करत आले आहेत. त्यांचे आई वडील शिक्षक होते. त्यामुळे त्यांना शिक्षकांच्या प्रश्नांची जाणीव आहे. पदवीधरांच्या काय समस्या असतात याची देखील त्यांना जाण आहे. यामुळेच आपला हक्काचा माणूस विधानपरिषदेत असणे आपल्या दृष्टीने आवश्यक आहे. संदीप जोशी आपले सर्व प्रश्न व समस्या सोडविणार, असा विश्वासही रामदास तडस यांनी व्यक्त केला.
संदीप जोशी यांनी काल शुक्रवारपासून वर्धा जिल्ह्यातील विविध भागात प्रवास करीत आहेत. आज शनिवारी सेलू, हिंगणघाट, वर्धा येथे जाऊन तेथील स्थानिक कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. वर्धा येथील न्यू आर्टस कॉलेज, केसरीनंदन कन्या विद्यालय, अग्निहोत्री महाविद्यालय याठिकाणी शिक्षक, प्राध्यापकांच्या भेटी घेतल्या. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.संदीप जोशी यांनी बोलताना आपली राजकीय व सामाजिक पार्श्वभूमी उपस्थितांसमोर सांगितली.पदवीधरांच्या बेरोजगारीचा प्रश्न, शिक्षकांचे २००५ नंतरच्या पेशन्सचा प्रश्न असो ते सोडविण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचे संदीप जोशी यांनी सांगितले.
सेलू येथे झालेल्या सभेत मान्यवरांसह दीपचंद चौधरी विद्यालयाचे सचिव नवीनबाबू चौधरी, शिक्षण सभापती मिलिंद भेंडे, तालुका भाजपा अध्यक्ष अशोक कलोटे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी प्रामुख्याने उपस्थित होते. हिंगणघाट येथे पदवीधर मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी हिंगणघाटचे नगराध्यक्ष प्रेमचंद बसंतदानी, माधव चंदनखेडे, नितीन मडावी, रमेश टपाले, वसंतराव आंबटकर, महामंत्री किशोर दिघे, आपीआयचे शहराध्यक्ष शंकरराव मुंजेवार, तालुका उपाध्यक्ष भाग्येश देशमुख उपस्थित होते. हिंगणघाटमधील फिजीक्स पॉईंटचे संचालक सुनील पिंपाळकर यांच्यासह शहरातील अनेक शिकवणी वर्गाने संदीप जोशी यांना जाहीर पाठिंबा दिला. संदीप जोशी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
वर्धा येथे न्यू आर्ट महाविद्यालय, केसरीनंदन कन्या शाळा, अग्निहोत्री कॅम्पस याठिकाणी शिक्षक व इतर कर्मचारी यांच्या बैठकी घेतल्या. शिक्षकांना येणाऱ्या अडचणी व त्यांचे प्रश्न जाणून घेतले. हे प्रश्न सोडिवण्यासाठी मी तयार असल्याचे संदीप जोशी यांनी यावेळी सांगितले. यावेळी महिला विकास संस्थेचे अध्यक्ष डॉ.आर.जी.भोयर, वुमेन्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माधवराव पंडीत, अमोल गायकवाड, सचिन अग्निहोत्री, विजय देशपांडे उपस्थित होते.यानंतर संदीप जोशी यांनी वर्धा येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीला संबोधित केले. वर्धा येथील संघटनप्रमुखांच्या भेटी घेतल्या.