नविन स्वस्त धान्य दुकानाचे परवाने तात्काळ दया- कुबेर राठोड

27

🔹अन्यथा १५ डिसेंबर २०२० रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सामुहिक आमरण उपोषणाचा इशारा

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.22नोव्हेंबर):-हदगांव तालुक्यातील नविन स्वस्त धान्य दुकान मागणी अर्जदाराने स्थानिक प्रशासन व संबंधित सर्व विभागाचे प्रधान सचिव आणि मुख्यमंत्री व ईतर संबंधित सर्व मंत्र्यांना ई मेल व्दारे निवेदन पाठवण्यात आले. व तसेच १५ डिसेंबर २०२० पर्यंत तालुक्यातील सर्व नविन स्वस्त धान्य दुकानाचे परवाने न दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सामुहिक आमरण उपोषणाचा इशारा नविन स्वस्त धान्य दुकानाचे परवाने मागणी अर्जदारानी दिला आहे. व तसेच या प्रकरणातील दोषी अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्या वर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करुन हदगांव तालुक्यातील नविन स्वस्त धान्य दुकानाचे परवान्या विषयी अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव विलास पाटील व नागरी पुरवठा विभागाचे कक्ष अधिकारी शितल सावंत व तसेच संबंधित सर्व अधिकारी यांच्याशी कुबेर राठोड यांनी फोनवर थेट संवाद साधुन या विषयी सखोलपणे चर्चा करण्यात आली.

व तसेच या प्रलंबित प्रकरणा संबंधित नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण साहेब व हदगाव तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांना भेटून निवेदन देऊन थेट संवाद साधला.
नविन स्वस्त धान्य राशन परवान्यासाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील नविन राशन व निलंबित राशन दुकानेसाठी जिल्हाधिकारी नांदेड यांनी नविन राशन दुकानाचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी २०१७ साली जाहीर प्रगटन काढले होते. व तसेच निलंबित राशन दुकाने व नविन राशन दुकाने हे गांवातील ग्रा.पं.,स.से.स सो., महिला बचत गट, महिला मंडळ, पुरुष गट, शेतकरी गटांसाठी प्रथम प्राधान्याने हदगांव तालुक्यातील ३६ गावांसाठी ५८ प्रस्ताव तहसिल कार्यालय हदगांव येथे संबंधित अधिकाऱ्याकडे सर्व कागदपत्रांसह नविन स्वस्त राशन दुकानासाठी मागणी अर्ज दाखल केले होते. पण नांदेड जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात नविन स्वस्त धान्य राशन दुकानाचे परवाने देण्यात आले. पण हदगांव तालुक्यात आज पर्यंत एक ही नविन स्वस्त धान्य दुकानाचे मागणी अर्जदार यांना नविन राशन दुकानाचे परवाने दिले नाही. व तसेच या प्रकरणात कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही.
त्यामुळे कोरोना विषांणुचा काळात या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. व तसेच या प्रलंबित प्रकणाकरीता नुसत्याच दि.७ नोव्हेंबर २०२० रोजी पळसा येथे कुबेर राठोड यांच्या निवास स्थानी सर्व नविन स्वस्त धान्य राशन दुकान मागणी अर्जदाराची बैठक बोलवण्यात आली.व त्या बैठकीत प्रमुख पाहुणे म्हणून दिव्यांग विकास संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष समीर पटेल यांनी स्वस्त धान्य दुकाना बाबत विशेष मार्ग दर्शन केले. व तसेच या प्रलंबित नविन स्वस्त धान्य राशन अर्जदार दुकानासाठी तालुका स्तरावर एकता नविन स्वस्त धान्य दुकान समिती हि तयार करण्यात आली. हि समिती मार्फत जिल्हा व शासन स्तरावर सतत पाठ पुरावा करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली व त्या समितीचे अध्यक्ष म्हणुन कुबेर राठोड हे सतत वेळोवेळी जिल्हा व मंत्रालय स्तरावर सतत पाठ पुरावा करत असल्याचे समितीचे अध्यक्ष कुबेर राठोड यांनी सांगितले आहे.
नविन राशन दुकानाचे परवाने न दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सामुहिक आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यावेळी त्याच्या सोबत उपाध्यक्ष रमेश खिल्लारे, सचिव दिपक सुर्यवंशी व सह सचिव शंकर जगदाळे, मार्ग दर्शक तथा दिव्यांग विकास संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष समीर पटेल आणि कोषाध्यक्ष भाऊराव भालेराव, जि.के. कदम, सुनील आणेराव, तहेसिन फातेमा, शंकर कदम, दिनेश शिंदे, पुंजाजी नाईक, संदिप कदम, शंकर मेटकर, शकुंतला राठोड, पुष्पांजली माहुरे, शिवाजी परघणे, पांडुरंग काळबांडे, माधव महानुरे, योगेश राठोड, एकनाथ चव्हाण, महेश राठोड,नंदाबाई कांबळे आदिसह या वेळी उपस्थित होते…
*चौकट मध्ये बातमी*
🔹१५ डिसेंबर २०२० रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सामुहिक आमरण उपोषणाला बसणार.
🔸या प्रकरणातील सर्व दोषी अधिकारी व कर्मचारी वर तात्काळ कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी.
🔹प्रलंबित प्रकरणासाठी एकता नविन स्वस्त धान्य दुकान समिती हि तयार करण्यात आली.
🔸अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव विलास पाटील व नागरी पुरवठा विभागाचे कक्ष अधिकारी शितल सावंत यांच्याशी फोनवर चर्चा करण्यात आली.
🔹आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांना भेटून या विषयी निवेदन व थेट संवाद साधण्यात आला