पदवीधर युवकांनो, कंत्राटी बंधू भगिनींनो सावधान,काळजी घ्या आपल्या भविष्याची !

28

🔹रयत शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर

✒️नवनाथ आडे(गेवराई,विशेष प्रतिनिधी)मो:-9075913114

बीड(दि.23नोव्हेंबर):-मराठवाडा सह राज्यातील पदवीधर मतदारसंघ निवडणुकांतील प्रश्न व आश्वासने आजपर्यंत मी जवळून पाहिले सरकारने पदवीधर मतदारसंघ का व कशासाठी केले याचा कुठेही ताळमेळ लागतोय का? आमच्यासाठी आजपर्यंत कुठल्या कल्याणकारी योजना राबविल्या? आमचे किती प्रश्न निर्माण असताना किती सोडवले?असा सवाल राज्यातील पदवीधर व विविध कंत्राटी पद्धतीने कामावर रुजू असणारे व तोडके मानधनात प्रचंड मेहनतीने काम करत असताना पदवीधरांची घोर फसवणूक केली असल्याचं अनेक राज्यातील पदवीधर रयत शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष अड रवीप्रकाश उर्फ बापूसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील हजारो पदाधिकारी यांच्या मार्फत विचारण्यात येत असून पदवीधर सर्वच स्तरातून, विभागातून अतिशय वाईट वाटते प्रश्न खूप गंभीर आहेत.

आजपर्यंत पदवीधर यांचे प्रश्नावर पदवीधरांना हक्काचा असा एकही लोकप्रतिनिधी मिळाल्याचे समाधान नाही केवळ निवडणूक, स्टंट, खोटे अमिश नुसत्या घोषणा,पार्टी,नेता,पक्ष, संघटना यांचे बळावर निवडणुका जिंकून घेत बाकी निवडणुका तोंडावर आल्या की पदवीधर बंधू भगिनींना समाजातील,पक्षातील, नाते,पाहुणे, मित्र परिवार यांचेजोरावर निवडणुका जिंकली जाते निवडणुकीत सगळे उमेदवारांपैकी राज्यात योग्य ते उमेदवार निवडून आणण्यासाठी रयत शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपणारा आमदार करणेसाठी आपण लवकरच भूमिका स्पष्ट करणार आहोत मतदार यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील कुठे दिसून येत नाही.

पदवीधरांना सावध राहावे सध्या कोरोना येवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यामुळे आपली व कुटुंबाची मित्र परिवार सर्वांची सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे आमदारकीच्या कार्यकाळात आपण काय करू शकले याचा हिशोब मागण्याचा हक्क पदवीधर यांचा असून रयत शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आजपर्यंत युवक, विध्यार्थी,युवती, विविध विभागातील कंत्राटी कामगारांना मदत होईल.

यासाठी मी व माझ्या राज्यातील सर्व पदाधिकारी कायम सर्वोतोपरी सहकार्य केले यापुढे कायम सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे कुठल्याही विषयावर कोणत्या आमदार साहेबांनी निवडणुकीत दिलेले वचन पाळले त्यांचा रयत शेतकरी संघटनेच्या वतीने जाहीर सत्कार समारंभ आयोजित करण्यात येईल राज्यातील पदवीधरांना फक्त राजकीय झोळी भरण्यासाठी वापर केला असे मत प्रदेश सरचिटणीस सुनील नानासाहेब ठोसर पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.