ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता इतर समाजाला आरक्षण द्यावे – बाळासाहेब कर्डक

    41

    ?ओ.बी.सी बचाव मोर्चा संदर्भात शहादा येथे बैठक

    ✒️संजय कोळी(विशेष प्रतिनिधी)मो:-9075716526

    शहादा(दि.23नोव्हेंबर):- येथील ओबीसी बचाव मोर्चा संदर्भात नुकतीच बैठक घेण्यात आली राज्याचे अन्न नागरी पुरवठा व संरक्षण मंत्री तथा समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष यांच्या आदेशाने महाराष्ट्र भर समता परिषदे मार्फत ओबीसी बचाव मोहीम घेण्यात येत असून शहादा येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीचे अध्यक्ष व मार्गदर्शक समता परिषदेचे उत्तर विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक हे उपस्थित होते.

    तसेच प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय संघटक अनिल भाऊ नळे, विभागीय सरचिटणीस अरुण जी थोरात, कायदेशीर सल्लागार म्हणून ॲड प्रतिक कर्डक व धुळे नंदुरबार जिल्हा निरीक्षक नितीन भाऊ शेलार यांची उपस्थिती होती. यावेळी विभागीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब कर्डक यांनी ओबीसी आरक्षण बाबत सखोल माहिती देऊन ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता इतर समाजाला आरक्षण द्यावे.

    त्यासाठी आमचा पाठिंबा असेल परंतु ओबीसी आरक्षणाला व त्याच्या कोट्याला धक्का लावता कामा नये नाहीतर सर्वत्र महाराष्ट्र समता परिषदेतर्फे निदर्शने व आंदोलने करण्यात येतील आणि समता परिषद रस्त्यावर उतरेल असे आव्हान यावेळी बाळासाहेब कार्डक यांनी याप्रसंगी केले कार्यक्रमाचे आयोजन समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ जिल्हा उपाध्यक्ष विनोद अहिरे जिल्हा सरचिटणीस रमाशंकर माळी शहादा तालुका अध्यक्ष जगदीश भाऊ माळी ईश्वर वारुळे शहादा तालुका युवक अध्यक्ष प्रवीण माळी यादव माळी बापू माळी घनश्याम माळी तळोदा नगरपालिकेचे नगरसेवक जितेंद्र सूर्यवंशी तळोदा माळी समाज पंच अध्यक्ष अरविंद मगरे, आबा भाउ महाजन तसेच सर्व ओबीसी समाजाचे अध्यक्ष व जिल्ह्यातील ओबीसी समाज बांधव या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते.

    कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शहादा येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व आई सावित्रीबाई फुले यांच्या भव्य स्मारकास अभिवादन करण्यात आले यावेळी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने ओबीसी समाज व समता सैनिक या कार्यक्रमास उपस्थित होते.