पदविधर मतदारसंघाच्या मतदाना वेळी मतदान ओळखपत्र नसल्यास, इतर 9 प्रकारच्या ओळखपत्रांचा पर्याय

31

🔸जिल्हाधिकारी यांनी दिली माहिती

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

गडचिरोली(दि.23नोव्हेंबर):- नागपूर विभाग पदविधर मतदारसंघाची व्दिवार्षिक निवडणूक-2020 च्या अनुषंगाने सर्व पदविधर मतदार यांना मतदानावेळी मतदान ओळखपत्र नसल्यास इतर 9 प्रकारच्या ओळखपत्रांचा पर्याय निवडणूक आयोगाकडून देण्यात आला आहे. याबाबतचे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, नागपूर विभाग पदविधर मतदार संघ तथा जिल्हाधिकारी गडचिरोली दीपक सिंगला यांनी केले आहे. दिनांक 02 नोव्हेंबर पासून संपुर्ण गडचिरोली जिल्ह्यात आचारसंहिता लागू करण्यांत आलेली असून दिनांक 01 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.

दिनांक 01 डिसेंबर रोजी मतदानाचे दिवशी मतदान करताना मतदान केंद्रावर मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करू शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या (EPIC) व्यतिरीक्त पुढिलप्रमाणे कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. यामध्ये आधार कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, पारपत्र, केंद्र/राज्य शासन/ सार्वजनिक उपक्रम/स्थानिक स्वराज संस्था किंवा खाजगी औद्योगिक घराणे यांनी वितरीत केलेले सेवा ओळखपत्र, मा. खासदार / मा. आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र, संबंधित पदविधर / शिक्षण मतदार संघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या पदविधर /शिक्षक मतदारांना वितरीत केलेले सेवा ओळखपत्र, विश्वविद्यालयाव्दारे वितरीत पदवी/पदविका मुळ प्रमाणपत्र तसेच सक्षम प्राधिकरणाव्दारे वितरीत केलेले अपंगत्वाचे मुळ प्रमाणपत्र.
वरीलप्रमाणे ओळखपत्र मतदानाचे दिवशी सोबत नेण्यात यावे असे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, नागपूर विभाग पदविधर मतदार संघ तथा जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी केले आहे.

कोरोना बाबत सर्व मतदान केंद्रांवर तयारी सुरू : जिल्हयातील पदविधर मतदान प्रक्रिये वेळी सर्व मतदान केंद्रांवर कोरोना संसर्गाबाबत आवश्यक तयारी करण्यात येत आहे. मतदारांनीही येताना तोंडाला मास्क लावून यावे तसेच मतदान केंद्रात दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. प्रत्येक पदवीधर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात येत आहे.