जनतेने चुकीच्या बातमीला बळी पडू नये – मनसे तालुका उपाध्यक्ष रोशन लोखंडे

32

✒️वरुड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

वरुड(दि.24नोव्हेंबर):-महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही राज्यातच नव्हे तर तालुका स्तरावर सुद्धा न्याय मिळवून देण्यासाठी सक्षम आहे.संपूर्ण जगात आलेल्या कोरोना (कोविड १९) च्या वैश्विक महामारीमुळे आलेल्या संकटामुळे ऑटो यूनियन ची लोणी- वरुड ची तिकिट २५ च्या ऐवजी ५० करण्यात आली होती.कारन प्रवाशी ने-आन करण्याची परवानगी ही ४ ची केली होती.

सर्वसामान्य जनतेचा विचार करुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ऑटो यूनियन व स्थनिक प्रशासन यांच्याशी चर्चा करून पूर्वीप्रमाणे म्हणजेच प्रवाशी ने-आन करन्याची परवानगी ही ७ ची करण्यात आली असुन टिकीट दर हे ५० च्या ऐवजी ३० रुपये करन्यात आली आहे.यात सर्वसामान्य जनता आणि ऑटो यूनियन या निर्णयापासून आनंदी आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा तालुका प्रमुख निलेश कोहळे यांनी दिलेल्या निवेदन पुर्णपणे समजून न घेता जनमाध्यमांना चुकिची प्रेस नोट दिली आहे,कारन म.न.से.ने म्हटले होते की, चोप दिली जाईल,परंतू ही चोप त्यांच्यासाठी आहे की ३० रुपये टिकिट असुन अनोळखी व्यक्तिपासुन ५० रुपये घेईल त्यांच्या साठी या चोप चा उपयोग केला होता.यावरुन सरळ लक्षात येते की,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा तालुकाप्रमुख निलेश कोहळे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला बदनाम करण्याचे शडयंत्र रचत आहे.

असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका उपाध्यक्ष रोशन लोखंडे यांनी केले असल्याचे दिसून येते. यावेळी मनसे चे कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच ऑटो युनियन चालक वाहक संघटना रुजेश विघे राहुल कडू पंकज कोंडे सुभाष कडू नीलेश भोंडे भूषण खेरडे सुनील तायवाडे बबलू उईके वैभव सोनारे फरीद शहा मनीष रत्नपारखी प्रमोद निंबाळकर गोपाल चारे हे उपस्थित होते