गडचिरोली जिल्ह्यात दोन मृत्यूसह गेल्या चोवीस तासात 110 नवीन कोरोना बाधित, 37 कोरोनामुक्त

29

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

गडचिरोली(दि.24नोव्हेंबर):- दोन मृत्यूसह आज जिल्हयात 110 नवीन बाधित आढळून आले. तर आज 37 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 7640 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 6802 वर पोहचली. तसेच सद्या 761 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 77 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. नवीन 2 मृत्यूंमध्ये वडसा तालुक्यातील मधुमेहाने तसेच हायपरटेंशनने ग्रस्त 60 वर्षीय पुरुषाचा समावेश असून ते शंकरपूर येथील रहिवाशी होते. तर दुसरी व्यक्ती ही वडसा तालुक्यातीलच कोरेगाव येथील 65 वर्षीय पुरुष आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.03 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 9.96 टक्के तर मृत्यू दर 1.01 टक्के झाला.

नवीन 110 बाधितांमध्ये गडचिरोली 58, अहेरी 12, आरमोरी 8, भामरागड 4, चामोर्शी 7, धानोरा 2, एटापल्ली 0, कोरची 8, कुरखेडा 2, मुलचेरा 3, सिरोंचा 3 व वडसा येथील 3 जणांचा समावेश आहे.

आज कोरोनामुक्त झालेल्या 37 रूग्णांमध्ये गडचिरोली 20, अहेरी 3, आरमोरी 0, भामरागड 0, चामोर्शी 3, धानोरा 3, एटापल्ली 3, मुलचेरा 0, सिरोंचा 4, कोरची 1, कुरखेडा 0 व वडसा मधील 0 जणाचा समावेश आहे.

नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील एनटीसी 1, गोकुलनगर 4, गुलमोहर कॉलनी 3, सुभाषनगर 1, इंदिरानगर 1, पारडी 1, कोटगल पारडी 1, विवेकनंदनगर 1, कन्नमवारवार्ड 2, धुंडेशिवनी 1, पोलीस नवेगाव 1, मथुरानगर 1, साईनगर 1, रामनगर 2, स्थानिक 19, साईनगर 1, आशिर्वादनगर 1, सोनापुर कॉम्पलेक्स 1, विसापुर 1, बसेरा कॉलनी 1, गणेशनगर 1, एसआरपीएफ 2, एमआयडीसी रोड 2, कोटगुल 1, कनेरी 1, साईनगर 1, भवानी 1, नवेगाव 1, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये वीर बाबुराव शेडमाके नगर 1, धरमपुरी वार्ड 2, स्थानिक 4, नागेपल्ली 1, महागाव 1, आलापल्ली 2, भगवंतराव शाळेजवळ 1, इंदाराम 1, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 7, कुरंदीमल 1, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, भगवंतराव शाळेजवळ 1, हिदुर 1, पीएस 1, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 2, घोट 1, रविंद्रपूर 2, कोनसरी 1, बहादुरपुर 1, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये कारवाफा 1, गोडलवाही 1, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये कोरची तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 6, स्थानिक 2, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये देलनवाडी 1, पुराडा 1, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 2, कांचनपुर 1, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये झिंगानुर 2, रंगायापल्ली 1, तसेच वडसा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, गांधीवार्ड 1,शंकरपूर 1, असा समावेश आहे. तर इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये 2 जणाचा समावेश आहे.