दुसऱ्या लाटेत कोरोनापासून बचावासाठी खबरदारी घ्या, सुरक्षित राहा – खासदार बाळू धानोरकर

29

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.25नोव्हेंबर):-महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने जनहितार्थ विशेष अधिवेशन बोलावून कोरोना महामारीची दुसरी लाट थोपविण्यासाठी अधिक सतर्कतेने नवीन दिशानिर्देश जरी करणे अत्यंत गरजेचे असून महाराष्ट्रातील जनतेला कोविड १९ चे संकटातून वाचवावे अशी विनंती चंद्रपूर – वणी- आर्णी लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार बाळू धानोरकर यांनी मुख्यमंत्राकडे पत्राद्वारे केली आहे.

देशातील सर्वच राज्यामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. राजस्थान, गुजराथ, दिल्ली या ठिकाणी पुन्हा एकदा कोरोना महामारी उग्ररूप धारण करीत आहे. या पाश्वभूमीवर नागरिकांनी कोविड १९ नियमावलीचे अतिदक्षतेने पालन करून सोशल डिस्टन्स, मास्क, सॉनिडायझरचा नियमित वापर बंधनकारक करावा.

नव्याने कोरोना रुग्णवाढ होत असल्यामुळे राज्यात शिथिल करण्यात आलेले निरबंध पुन्हा लावल्या जाऊ शकतात असे संकेत राज्य शासनाकडून दिले गेले आहेत. या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून बचाव करण्यासाठी सर्वानी ‘नो मास्क नो एन्ट्री’ मोहीम हाती घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी देखील खबरदारी घेण्याचे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले आहे.