संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन करून सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ नायगांवकर यांच्या कार्यालयात संविधान दिन साजरा

32

✒️शिवानंद पांचाळ(नायगांव,शहर प्रतिनिधी)मो:-9960748682

नायगाव(दि.27नोव्हेंबर):-भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करून भारतीय संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन करून उत्साहात संविधान दिन साजरा करण्यात आला.या नंतर २६ /११ मधील शहीद पोलीस बांधवांना १ मिनिट स्तब्ध उभे राहून आदरांजली अर्पित करण्यात आले.

या वेळी धोबी परीट समाज संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष गंगाधर मावले सर सामाजिक कार्यकर्ते गजानन फुलारी,संग्राम बेलकर, सचिन सुरेशराव फुलारी,भागवत बानेवाड धुंगराळेकर, शंकर पर्वत महाराज,संभाजी शंकरराव पांचाळ, दिगांबर पाटील कदम कांडाळर,राजेंद्र कांबळे नायगांवकर, बाळू ईबितवार ईकळीकर नायगांवकर,अदी प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.