सामाजिक न्याय विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्याकरीता विविध योजना

32

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

गडचिरोली(दि.27नोव्हेंबर):-सामाजिक न्याय विभागांतर्गत अनु.जाती, विमुक्त जाती-भटक्या जमाती, इतर मागसवर्ग व विशेष मागासप्रवर्गाच्या अर्जदारांना शैक्षणिक प्रयोजनार्थ- 12 वी विज्ञान, व्यावसायिक अभ्यासक्रम 2) सेवा प्रयोजनार्थ – आरक्षितप्रवर्गातून नियुक्ती/पदोन्नती 3) निवडणूक प्रयोजनार्थ – आरक्षित प्रवर्गातून स्थानिक स्वराज्य संस्थेतंर्गत उमेदवारीसाठी अर्ज व 4) अन्य प्रयोजनार्थ – आरक्षित प्रवर्गातून सदनिका, गाळे वाटप, पेट्रोल पम्प, जात वैधताप्रमाणपत्र लागू केलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजनांतर्गत लाभासाठी बार्टी, पुणे याचेhttps://bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतळावर ऑगस्ट 2020 पासून नवीन ऑनलाईन अर्ज भरणे व मूळ कागदपत्रे – पुरावे अपलोड करणे आवश्यक केलेले आहे.

आता निवडणूक व अन्य प्रयोजनार्थसहसर्वच प्रयोजनाकरीता ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक केलेले आहे.पूर्वीचा ऑनलाईन अर्जाचा नमुना व सद्याचा ऑनलाईन अर्जाचा नमुन्यातील माहिती यामध्ये फार बदल नाहीत. नवीन ऑनलाईन अर्जामध्ये पासपोर्ट फोटो, अर्जदार व पालकाची स्वाक्षरी तसेच मूळ जात प्रमाणपत्र (प्लेन),दोन शपथपत्र (मूळ) व फार्म नं. 15 अ (प्राचार्य/नियोक्ता अधिकारी /निवडणुक अधिकारी/ संबंधित कार्यालय प्रमुखयांचे शिफारस पत्र प्रयोजन नुसार) व जाती दावा संदर्भात पुराव्यांच्या मूळ प्रती अपलोड करावयाचे आहेत.

कोणताही पुरावा/ कागदपत्रे झेरॉक्स अपलोड केलेले ग्राह्य नाही. तसेच भरण्यात आलेल्या ऑनलाईन अर्जाची प्रिंट काढून उपरोक्त नमूद मूळ व एक संच स्वसांक्षाकित झेराक्स प्रतीसह जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, शासकियआय. टी. आय. चौक, एल. आय. सी. रस्ता, डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन, गडचिरोली कार्यालयात ऑफलाईन सादर करणे व त्याची निर्धारीत फी भरुन पावती घेणे आवश्यक आहे, ही प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय अर्जदाराचेअर्जावर कोणतीच प्रक्रिया केली जाणार नाही.

नवीन ऑनलाईन अर्जामध्ये बाब 1 मध्ये अर्जदाराची स्वतःची वैयक्तिक व प्राप्त जात प्रमाणपत्र संबंधीत माहिती, बाब क्र. 2 मध्ये अर्जदाराचा पत्ता, बाब 3 मध्ये अर्जदाराची शैक्षणिक माहिती, बाब 4 मध्ये अर्जदाराचे कुटूंबाची माहिती, बाब 5 मध्ये कुटूंबाचे अधिवास/स्थलांतराबाबतची माहिती, बाब 6 मध्ये अर्जदाराचे कुटूंबियामध्ये पूर्वी जात वैधता प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्याचा तपशिल याबाबतची माहिती परिपूर्ण भरणे व बाब 7 मध्येअपलोड करावयाचे पुरावे / कागदपत्रांच्या नमूद यादीतील संबंधीत कागदपत्राचे समोर ते अपलोड केल्यानुसार होय नाही बाबत फक्त ‘  ‘ टीक मार्क करावयाचेआहे.

आवेदन पत्राचा नमुना अत्यंत सोप्या भाषेतदिलेला असल्याने व त्यात जास्त माहिती भरावयाची नसल्यानेअर्जदार – विशेषतः विद्यार्थी ते स्वतः देखील भरु शकतात व कागदपत्रे मोबाईलवर स्कॅन करुन अपलोड करुशकतात. तथापि बारावी विज्ञान शाखेतील व व्यावसायीक अभ्यासक्रमाचे प्रवेश प्रक्रियेतील अर्जदार- विद्यार्थी हे अर्जजवळच्या नेट कॅफेकडून भरुन घेतात व त्याकरीता नाम मात्र फी नेट कॅफेधारक यांनी आकारायची असताना 250 ते 700/- रुपयापर्यंत रक्कम उकळण्यात आल्याचे कळते. जेव्हा की याकरीता रु. 100 ते 150/- प्रति अर्ज अपेक्षितआहे.

कागदपत्र/ पुरावे अपलोड करण्यासाठी काही नेट कॅफे धारक पुनश्च अतिरिक्त शुल्क रु.25 ते 30 प्रती घेत असल्याचेही कळले आहे ज्या करीता शुल्क प्रती कॉपी रु. 5 ते 10 अपेक्षित आहे फक्त काही मोजकेच नेटकॅफेधारक अर्ज भरण्यासाठी व पुरावे अपलोड करणेसंदर्भात वाजवी शुल्क आकारतात. पुरावे/कागदपत्रे अपलोडकरताना झेरॉक्स प्रत अपलोड करणे ग्राह्य नसताना जादा शुल्क आकरण्याठी झेरॉक्स, अनावश्यक कागदपत्रे, दुबार कागदपत्रे अपलोड केल्याचेही आढळून आले.

आहे किंवा काही कागदपत्रे योग्य रितीने अपलोड न केल्याने व त्यातील सर्व नोंदी पूर्ण दिसतील अशा अपलोड न केल्यानेतेनेट कैफे वाल्यांच्या चुकीमुळे दुबार अपलोड करावे लागतात.असे अर्धवट/ अपूर्ण अपलोड केलेले कागदपत्रांचा अर्ज स्विकारले जाणार नाही. व त्याकरीता संबंधित अर्ज भरुन देणारे नेट कॅफेधारक जबाबदार राहतील.

अर्जासोबत फक्त पुढील कागदपत्रे अपलोड करावी- .
प्राथमिक पुरावे अंतर्गत – अर्जदाराचे जात प्रमाणपत्र, नमुना-3 व नमुना 17 चे शपथपत्र, नमुना-15अ थेशिफारसपत्र (प्राचार्य/कार्यालय-प्रमुखाचे), अर्जदाराचा फोटो व स्वाक्षरी, पालकाची स्वाक्षरी, दुय्यम पुराव्यामध्येअर्जदाराचे स्वतःचे जन्म प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक नाही. हे फक्त निवडणूक प्रयोजनार्थ उमेदवार ज्यांचाजन्म अनु.जाती करीता 10 ऑगस्ट 1950, विजाभज करीता 21.11.1961 व इमाव तसेच विमाप्र करीता 13 आक्टोबर 1967 पुर्वी असल्यासच त्यांचे करीता लागू राहील.

अर्जदाराचा स्वतःचा, वडीलांचा व सख्खे आजोबायांचे सह मोठे वडील/मोठी आत्या, चुलत आजोबा यांचा वर्ग 1 ते 4 प्राथमिक शिक्षणाचा शाळा सोडल्याचा दाखलासंलग्न करणे आवश्यक आहे. यामध्ये माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय किंवा वरिष्ठ महाविद्यालयचा दाखला संलग्न करु नये. याशिवाय महसुली पुराव्यात वडीलांकडील रक्त नाते वाईकांचे नावे (वडील)आजोबा, पणजोबा)बक्षिसपत्र, इनाम सनद, मॉर्टगेज (मराठी शब्द पाहणे), दाखल करता येईल. शेती असल्यास (पुर्वी असल्यासही)एकाच सर्वे नंबरचे अधिकार अभिलेख पंजी, पी-9, पी-11 (खसरा पाच सालाचा) किंवा पी-1, त्याचा रीनंबरींग पर्चाव रीनंबरींग पर्चात नमूद सव्हे नंबरचा 7/12 सादर करता येईल. जन्म – मृत्युची कोतवालपंजी सोबत त्या संबंधितगाव-शहरातील मानीव दिनांकापुर्वीचा / लगतचा अधिवास पुरावा सादर करणे आवश्यक आहे.

अर्जदारास त्यांचे जातीचा प्रवर्गानुसार अनु.जातीकरीता 10 ऑगस्ट 1950, विमुक्त जाती -भटक्या जमातीकरीता 21 नोव्हेंबर 1961, इतर मागासवर्ग वविशेष मागासप्रवर्गाकरीता 13आक्टोंबर 1967 ही मानीव दिनांक निर्धारीत करण्यात आलेली असून त्या त्या प्रवर्गातील अर्जदाराकडे त्यांचे जात प्रवर्गानुसार सदर मानीव दिनांकापुर्वीचे जात नोंदीचे व अधिवासाचे पुरावे असणे व ते सादर करणे आवश्यक आहे. तसेच तो पुरावा ज्या व्यक्तिीच्या नावे आहे, व्यक्तिपर्यंत सहसंबंध दर्शविणारे कुटूंबातील व्यक्तीचे शैक्ष/महसुली पुरावा सादर करणे आवश्यक. याशिवाय अर्जदाराचे सख्खे कुटूंबियाचे नावे मानीव दिनांकापुर्वीचा अधिवास पुरावा(जसे ग्रामपंचाय/नगरपंचायत/नगर परिषद येथील करआकरणीची नोंद – नमुना-8/9,12 व किंवा 17) गडचिरोली जिल्ह्याचा असणे आवश्यक आहे. मानीव दिनांकापुर्वीचा अधिवास गडचिरोली जिल्ह्याचे बाहेरील क्षेत्रातील/जिल्ह्यातील असल्याससंबंधित क्षेत्रातील सक्षम प्राधिकाऱ्याकडून जात प्रमाणपत्र प्राप्त करुन संबंधित जिल्ह्याचे जात प्रमाणपत्र पडताळणीसमितीकडे अर्जदाराने प्रस्ताव दाखल करावा.

अर्जासोबत सादर वंशावळ फार तोटक असते. त्यामध्ये अर्जदार वडीलांचे आजोबांचे व पणजोबा या सर्वाचे सख्खे भाऊ बहिणी यांचे नाव समाविष्ठ असणे आवश्यक आहे. तसेच वंशावळ ही खरी व योग्य असावी. त्यामध्ये नावे समाविष्ठ करताना कुटूंबातील पुर्वजांचे नावांची सहसंबंधाची माहिती घेऊन योग्य प्रकारे नोंद करावी एकदा सादर वंशावळमध्ये नंतर बदल करता येणार नाही.तरी याबाबत विद्यार्थी/संबंधीत अर्जदार व पालक वर्ग यांनी दक्षता पूर्ण अर्ज भरणे व आवश्यक मूळकागदपत्रे अपलोड करण्याची व सादर करण्याची कार्यवाही करावी.असे उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती राजेश शा.पांडे यांनी कळविले आहे.