विद्यार्थी स्कॉलरशिप पासून अजूनही वंचित

    104

    ?शिष्यवृत्ती गरीब विद्यार्थ्यांना आधार

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

    ब्रम्हपुरी(दि.28नोव्हेंबर):- महाराष्ट्र राज्य शासना कडून समाज कल्याण विभागातर्फे मॅट्रिकोत्तर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. परंतु सत्र 2019 – 20 या सत्रातील विद्यार्थ्यांंना अजून पर्यंत एक हप्ता सुद्धा मिळालेला नाही.महाराष्ट्र सरकार दर वर्षी प्रि – मॅट्रिक व पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्ती गरीब विद्यार्थ्यांना देऊ करते. त्यातून विद्यार्थी प्रवेश, शैक्षणिक साहित्य खरेदी तसेच परीक्षा फी यासारखे खर्च करीत असल्याने पालकांवर खर्चाचा बोजा पडत नाही.

    परंतु या वर्षी शेतीचे कमी उत्पादन, पूर परिस्थिती, कोरोना काळ असून सामान्य माणसाला दोन वेळ च्या जेवणाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश व ईतर शैक्षणिक खर्च करणासाठी पैसे नसल्याने शिक्षणात खंड पडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्वरीत शिष्यवृत्ती देण्यात यावी अशी मागणी विद्यार्थी व पालक यांच्याकडून होत आहे.