पदवीधर गृहभेट फेरीचा आज समारोप

28

🔸ना.धनंजय मुंडेंच्या नेतृत्वात परळी मतदार संघातून मिळणार विक्रमी मताधिक्य

🔸महाविकास आघाडीने परळी पिंजून काढली

🔹परळीचे पदवीधर सतिष चव्हाण यांच्या विजयी हट्रिकचे साक्षीदार होणार

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

परळी वैजनाथ(दि.28नोव्हेंबर):-राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचे उमेदवार आ.सतीष चव्हाण यांच्या प्रचारार्थ परळी शहरात प्रचारफेरी चे नियोजन करण्यात आले आणि प्रचारात महाविकास आघाडीने मुसंडी घेत भेटीगाठीवर भर व प्रत्यक्ष गृहभेटी घेण्यात आल्या.या संपर्क मोहीम व भेटींमुळे पदवीधर मतदारांचा समर्थनाचा निर्धार स्पष्ट दिसुन येत आहे.पदवीधर गृहभेट फेरीचा आज समारोप होणार आहे.

आजच्या प्रचारफेरीत छत्रपती शिवाजी महाराज चौक, जय नगर,नाथ नगर, माणिक नगर, शास्त्री नगर,शिवाजी नगर, पावरलूम वसाहत, हबीबपुरा, मलिकपुरा, संत तुकाराम नगर, वडसवित्री नगर, वडार कॉलनी, रेहना नगर,बसवेश्वर कॉलनी, नवगण कॉलेज परिसर, पंचवटी नगर प्रचारफेरी काढून गृहभेटी घेण्यात आल्या.

या प्रचारफेरीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी,शिवसेनेचे तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष बाबुभाई नंबरदार,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते सुरेश टाक,वैजनाथ सोळंके, नगरसेवक शरद मुंडे, शरीफभाई शेख, जमील अध्यक्ष शिवसेनेचे जेष्ठ नेते नारायण सातपुते, राष्ट्रवादी युवक चे शहराध्यक्ष सय्यद सिराज,संजय देवकर, दत्ता सावंत,शिवसेनेचे शहरप्रमुख राजेश विभूते, शिवसेनेचे जिल्हा संघटक रमेश चौंडे,डी. यस. राठोड,संगमेश्वर फुटके,कॉंग्रेसचे शेख अल्ताफ,शेख सिकंदर, जब्बार सेठ, रा.कॉ. नागरिक सेलचे अध्यक्ष के.डी.उपाडे,देवराव कदम, संजय देवकर, लक्ष्मण वाकडे, अमोल कांबळे,शिक्षक नेते वसंत कांबळे, प्रा.सुनिल चव्हाण, नारायण वानखेडे, शेख जफर,राहुल ताटे,विनोद देशमुख,रंगनाथ सावजी, पवन फुटके, अमित केंद्रे, अभिजीत धाकपडे, ज्ञानेश्वर होळंबे, अभिजीत शेन्द्रे, अनंत ढोपरे, जितेंद्र नह्वाडे ,संजय सुरवसे, संजय वानखेडे,गाया परवेज, प्रा.शाम दासूद,मनसब भाई, सरताज सर, वाजेद खान, शेख चांद, बाबभाई टेलर, अलाउद्दीन शेख, अन्सार खान, मतीन शेख, शादुल्ला पठाण, गणेश सुरवसे, उमेश सुरवसे, रामकीशन टेकाळे, प्रल्हाद नखाते आदींसह महाविकास आघाडीचे नेतेगण नगरसेवक डॉक्टर्स वकील शिक्षक प्राध्यापक मोठ्या संखेने उपस्थित होते.

🔹आजचा प्रचार दौरा
सुरुवात : -प्रभाग क्रमांक 10 व 11 सकाळी 8 वाजता.छत्रपती शिवाजी महाराज चौक, वल्लभ नगर, पंचशील नगर, कंडक्टर कॉलनी, विद्या नगर, माधवबाग, शारदा नगर, सोमेश्वर नगर, रेल्वे कॉलनी, भगवानबाबा चौक, इरिगेशन कॉलनी, हरिदास नगर, माऊली नगर, समता नगर, जलालपूर, शिक्षक कॉलनी, जिरगे नगर, प्रिया नगर, बँक कॉलनी, साई नगर.