बिलोली शहरात 90रक्तदात्यानी दिले रक्तदान

30

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी )मो:-9970631332

बिलोली(दि.30नोव्हेंबर):- शहरात शेर – ऐ- हिंद शहिद हजरत टिपु सुल्तान यांच्या जयंती निमित्त अॉल इंडिया तन्जिम -ऐ- इन्साफ च्या बिलोलीच्या वतीने पोलीस स्टेशन बिलोली समोर रविवारी दि 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते 5.पर्यंत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. हजरत टीपु सुल्तान यांच्या 270 वी जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार टाकून अभिवादन करण्यात आले. होते.सदरील शिबीरात 90रक्तदात्यानी रक्तदान केले.शिबाराचे उद्घाटन उपजिल्हा रुग्णालयाचे वैदकीय अधिक्षक डॉ नागेश लखमावार यांच्या हस्ते करण्यात आहे.

यावेळी प्रभारी नगर अध्यक्ष मारोती पटाईत ,पोलीस निरिक्षक शिवाजी डोईफोडे, तंजिमचे जिल्हा अध्यक्ष अब्दुल माजीत बशीर,डॉ जहीर सिद्दिकी, नगर सेवक अनुप अंकुशकर,जुबेर खान, अमेर शेख, मोईन कुरेशी,अदीची प्रमुख उपस्थिती होती. रक्तदान शिबिर यशस्वीतेसाठी अॉल इंडीया तंजिम ऐ इंसाफ ते तालूका अध्यक्ष ए.जी.कुरेशी,कार्याध्यक्ष वलीओद्दीन फारुखी ,सचिव सय्यद रियाज , उपाध्यक्ष मौलाना अहेमद बेग,शेख सुलेमान शेठ शेख फारुख,एम.ए माजीद सर, मुबिन मौलाना ,जावेद कुरेशी, शेख युनुस कासराळीकर अदिनी कार्यक्रम यशस्वीते साठी परिश्रम घेतले. विष्णुपुरी येथील डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालय रक्तपेढीचे डॉ.शितल गजले रक्त संक्रमन अधिकारी, निलेश पवार,विनोद भोंगे,अतुल ताकसाडे, लक्ष्मन येळगे, मारोती वनंजय,आरोळी चालक, अदी कर्मचारी उपस्थित होते.

पोलीस निरिक्षक शिवाजीराव डोइफोडे याचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमात मुफती सय्यद युनुस सहाब, संतोष शेखापुरे,अबरार बेग ईनामदार,फीरदोस सय्यद , असलम कुरेशी, इरफान,माजीत मेकानीक,अलीम शेख,अब्बु पठान अदी जन उपस्थित होते.