भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा यवतमाळ तर्फे पौर्णिमा कार्यक्रम संपन्न

    39

    ✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

    पुसद(दि.30नोव्हेंबर):-दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा जिल्हा शाखा यवतमाळ तर्फे पौर्णिमा कार्यक्रम अभियाना अंतर्गत स्थानीय बोधिसत्व बुद्धविहार यवतमाळ येथे दुपारी 2ते5 या वेळेवर प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष रवीजी भगत हे उपस्थित होते .नतर प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा.मुकुंद दखणे हे उपस्थित होते.

    सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामूहिक त्रिशरण पंचशील घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.प्रास्ताविक भाषण तालुकाध्यक्ष मोहन भवरे यांनी केले.या कार्यक्रमाप्रसंगी “डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीमुळे समाजात झालेला बदल”या विषयावर आद.प्रा.मुकुंद दखणे यवतमाळ यांनी मार्गदर्शन केले.

    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपेश वानखेडे यांनी केले तर आभार रंजनाताई ताकसांडे यांनी मानले.या कार्यक्रमासाठी संस्थेच्या यवतमाळ जिल्हा शाखा ,यवतमाळ तालुका शाखा,सर्व महीला शाखा पदाधिकारी,केंद्रीय शिक्षक,केंद्रीय शिक्षिका, बौद्धांचार्य,सैनिक, युवक,युवती आणि सर्व समाज बाधव, ऊपासक, ऊपासिका ईत्यादी उपस्थित होते.या कार्यक्रमाची सांगता सरणतय गाथेने करण्यात आली.