डिवाइन थाॕटस् ह्या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन

44

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

गडचिरोली(दि.30नोव्हेंबर):-)- राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराज यांच्या विचारांवर आधारित डिवाइन थाॕटस ह्या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन गोंडवाना विद्यापीठात प्रभारी कुलगुरू प्रो. श्रीनिवास वरखेडी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कुलसचिव डाॕ. ईश्वर मोहुर्ले , श्रीगुरूदेव सेवा मंडळाचे जिल्हाप्रमुख डाॕ. शिवनाथ कुंभारे , ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर , श्री. मोरे, पत्रकार उदय धकाते उपस्थित होते.

सर्वप्रथम श्रीगुरूदेव सेवा मंडळातर्फे कुलगुरू प्रो. वरखेडी आणि कुलसचिव डाॕ . मोहुर्ले यांचे ग्रामगीता देऊन स्वागत करण्यात आले. प्रास्तविक बंडोपंत बोढेकर यांनी केले. तर उदय धकाते यांनी आभार मानले. श्रीगुरूदेव सेवा मंडळाच्या सेवा कार्याची माहिती डाॕ. कुंभारे यांनी दिली. राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्या वतीने प्रस्तुत पुस्तकाची निर्मिती करण्यात आलेली आहे.