ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या फुलांची पडझड व किटकांचा प्रार्दुभाव

39

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

बिलोली(दि.30नोव्हेंबर):-जिल्ह्यासह बिलोली तालुक्यात गेल्या चार दिवसा- पासून ढगाळ वातावरण असल्याने तुरीच्या फुलांची पडाझड व तुरीवर किटक आळ्यांची वाढ झाल्याने पुन्हा एकदा शेतक-यावर नैसर्गिक संकट आल्याने अर्थिक घडी मोडणार असल्याने शेतक-यांच्या मनात भिती निर्माण झाली आहे. अतिवृष्टीने खरीप हगांमातील सोयाबीन पाठोपाठ कापुस, उडीद, मुगासह इतर पिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे. आर्थिक घडी मोडल्याने फारमोठ्या संकटात शेतकरी सापडला आहे.

फुलांनी डवरलेल्या तुरीकडून त्याला चांगले उत्पादन व भाव मिळेल या अपेक्षा आहेत. पण गेल्या ४ते ५ दिवसापासून ढगाळ वातावरण तुरीसाठी बाधक असल्याने चिंता वाढली आहे. कडाक्याची थंडी तुरीसाठी पोशक असते परंतू थंडीने जोर धरला नाही. त्यातच ढगाळ वातावरण व आवकाळी पावसाची शेतक-यांच्या मनात धास्ती आहे. तालुक्यात तुरीच्या शेती पिवळ्या व गुलाबी रंगाने बहारलेल्या दिसत आहेत. तुरीचे शेत बघुन पुढचा आंदाज सांगता येत नाही. गेल्या चार वर्षाचा अनुभव पाहता उत्पादन घरी आल्या शिवाय व चांगला भाव मिळे पर्यंत काहीच खरे नसते. असे शेतकरी विश्वनाथ आप्पा मठवाले यांनी आपली भावना बोलून दाखवली.

सद्यस्थित हाता तोंडासी आलेल्या तुरीचे तुरीचे पिक वाया जाते की काय ? या सम्रात शेतकरी आहे.फुलांनी डवरलेल्या शेतात फुलांचा सडा जमिनीवर दिसत असल्याने शेतकरी वेगवेगळ्या कंपनीच्या औषदाचे फवारणीच्या कामात शेतकरी गुंतलेला दिसत आहे. शेतक-यांना अनुदानावर फवारणीचे औषध द्यावे अशी मागणी होत आहे.