भोजाजी महाराज मंदिरात पूरणपोळी स्वयंपाकाला सशर्त परवानगी

37

🔹पधरादिवस आधीच करावी लागणार नोंदणी

🔸शासकिय नियमांचेही करावे लागणार काटेकोर पालन

✒️सचिन महाजन तालुका प्रतिनिधी(हिंगणघाट वर्धा )मो:-9765486350

हिंगणघाट(दि.1डिसेंबर):-कोरोना व्हायरसच्या कारणाने गेल्या मार्च महिन्यापासून भोजाजी महाराजांचे मंदिर दर्शनासाठी व पूरणपोळी स्वयंपाकासाठी सुद्धा बंद करण्यात आले होते हे तीर्थक्षेत्र पूरणपोळीच्या स्वयंपाकासाठी प्रसिद्ध असून रविवार व बुधवारी संपूर्ण विदर्भातुन हजारो भाविक स्वयंपाक घेवून येत असतात,गेल्या आठवडयापासून महाराजांचे समाधी दर्शन सुरु करण्यात आले आहे,परंतु स्वयंपाक मात्र बंद ठेवण्यात आले होते.

परंतु भाविकभक्तांची पूरणपोळी स्वयंपाकाची ओढ व आतुरता बघुन 1 डिसेंबर पासून स्वयंपाक सुरु करण्याचा निर्णय संस्थान ने घेतला असून शासकीय नियमांचे काटेकोर पालन करुण दिवसाला केवळ 50 स्वयंपाकालाच प्रवेश मिळणार आहे,तसेच एका स्वयंपाकावर फ़क्त 50 लोकांनाच प्रवेश असणार आहे. त्यासाठी 15 दिवस आधी देवस्थानच्या कार्यालयात नोंदणी करने आवश्यक असणार आहे, नोंदणी न करता येणाऱ्या स्वयंपाकांना मंदिरपरिसरात प्रवेश दिला जाणार नाही.

तसेच येणाऱ्या भविकांनी कोविड19 संसर्गाची शासण निर्देशित नियमावलीचे काटेकोर पालन करने अनिवार्य असणार आहे, स्वयंपाक स्थळी प्रसाद घेण्यासाठी येणाऱ्या भविकांना मास्क वापरे व सोशियल डिस्टन्स पाळने अनिवार्य असणार आहे, दहा वर्षा आतील मूले ज्येष्ठनागरिक व गर्भवती महिलांना प्रवेश बंद असणार आहे.

येणाऱ्या भाविकांनी शासकीय व संस्थान कडून निर्गमित केलेल्या नियमांचे पालन करुण भोजाजी महाराज संस्थानला सहकार्य करण्याचे आवाहन अध्यक्ष डॉ.विजय पर्बत यांनी केले आहे अधिक माहीतीसाठी कार्यालयाच्या 8888497636 वर संपर्क करता येणार आहे.