अंबड जंगलात आग लागून ८००झाडांची हानी, तर वन्य जीवाची हानी

37

🔺अकोले तालुक्यातील अंबड गाव येथील घटना

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी):-9403277887

अकोले(दि.2डिसेंबर):-आज जागतिक पर्यावरण दिवस आणि आज कर्मचार्यांच्या चुकीमुळे अंबड गावातील वनसंपदा सुरक्षित नाही यासारखे दुर्दैव कोणतेच असू शकत नाही तरी अशा बेजबादार लोकांना याचे शासन झालेच पाहिजे.अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.अकोले महाविद्यालय व एन एस एस विद्यार्थ्यांनी अंबड गाव दत्तक घेऊन अंबड ग्रामपंचायत व अकोले महाविद्यालयाचे वतीने गाव तीन वर्षे दत्तक घेणार म्हणून घेण्यात आलेल्या शिबिरात गावात झालेल्या निर्णयानुसार खोकडमाळी डोंगरावर 800 सिताफळ झाडे लावून संपुर्ण गाव वर्गणीमुक्त होईल.

या उद्देशाने अतिशय दुरदृष्टी निर्णय घेवून ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांनी मह्त्वाचे पाऊल उचलून जवळपास 36000 रू ड्रिपला खर्च करून विद्यार्थ्यांमार्फत वृक्षारोपण केले पण आजअशी निंदनीय घटना घडली व सर्व मनसुब्यांवर पाणी फिरले परंतू याला सर्वस्वी वनविभागाचा मुजोर कर्मचारी जबाबदार आहे.

खुप वेळा त्यांना जाळपट्टे घेण्याची विनंती केली होती पण पेट्रोल द्या माणसं लागतील असे बहाणे करून संबधित कर्मचार्यांने वेळ काढून घेतली म्हणून हा वाईट प्रसंग संपुर्ण गावावर आला यामध्ये आर्थिक नुकसान तर झालेच पण पर्यावरण व सरकारच्या निर्णयाची राख रांगोळी केली असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी म्हणले आहे.आठशे झाडे नष्ट झाल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले .सरपंच डी डी जाधव यांनीही या घटनेस दुजोरा देऊन चौकशीची मागणी केली आहे.