नगर पंचायत गोंडपिपरी, कोरपना व जिवती आरक्षण सोडतीवर हरकती व सुचना आमंत्रीत

31

✒️नितीन रामटेके(गोंडपीपरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8698648634

चंद्रपूर(दि.3डिसेंबर):- नगर पंचायत गोंडपिपरी, कोरपना व जिवती येथील सदस्य पदाच्या आरक्षणाची सोडत दिनांक 27 नोव्हेंबर 2020 रोजी काढण्यात आलेली आहे. सदर प्रारूप प्रभाग रचना, प्रभागदर्शक नकाशे व सदस्य पदांचे आरक्षण याबाबत हरकती व सुचना दिनांक 9 डिसेंबर 2020 पर्यंतच्या कालावधीपर्यंत संबंधीत नगरपंचायत मुख्याधिकारी यांचे कार्यालयात मागविण्यात आल्या आहेत.

प्राप्त झालेल्या हरकती व सुचनांवर दिनांक 15 डिसेंबर 2020 रोजीपर्यंत सुनावणी घेण्यात येईल, असे जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरविकास शाखेचे जिल्हा प्रशासन अधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी कळविले आहे.