वनविभागाचा तोतया बोगस अधिकाऱ्यांनी मुला-मुलींना फसविले

33

🔺वन विभागाचा गणवेश परिधान करून लग्नाची केली बोलणी

🔺बाप बेटांना अटक

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)मो:-9403277887

नांदगाव(दि.4डिसेंबर):-वनविभागाचा उपविभागीय अधिकारी असल्याचे भासवुन नोकरीचे अमिष दाखवुसन तरुण मुला मुलींना फसविणारा बोगस ( तोतया )अधिकारी लहु साहेबराव जायभावे वय ३५ व साहेबराव भावराव जायभावे रा. काकडहिरा ता. पाटोदा जि. बिड या दोघा बाप बेट्यांना अटक करण्यात आले आहे हे दोघे मुलांना नोकरीचे व मुलींना लग्नाचे अमिष दाखवत फसवनुक करीत होते यांना नांदगांव वनविभागाने सापळा रचून मनमाड येथे ताब्यात घेतले या बाबात सविस्तर असे की,

बेजगाव ता. नांंदागंव. येथील. एक कीर्तनकारचे पाटोदा जि बिड येते किर्तन होते तेथे त्यांनी ओळख कार्ड वाटले होते ते कार्ड घेऊन बोगस नव अधिकारी नांदगांव बरेजगांव येथे पोहचला तेथे काही दिवस मुक्कामी राहिला अोळखि करुन घेत अधिकारी असल्याचे भासवत नोकरीचे अमिष दाखवत होता.

नांदगांव. येथे वनविभागाचा नविन अधिकारी असल्याचे भासवत तोतयाने आनेकांना भुरळ घातली या दरम्यान कासारी येथे एका धार्मीक कार्यक्रमात त्याची ओळख दाखवत या दरम्यान त्याने ग्यानेश्वर इपर नामक एका तरूणाकडून पाच हजार रु घेऊन नवविभागाकडे नोकरीची आँर्डर दिली ति आँर्डर वनविभागाचे डी डी बोरसे, रामचंद्र गंडे यांना दाखविली असता हा प्रकार बोगस असल्याचे समजले या वरुन वनविभागाने तोतया अधिकार्याचा तपास घेत त्यास मनमाड येथे ताब्यात घेतल्या त्याच्या सोबत त्याचे वडिल देखील होते.

या तोतयास ताब्यात घेतले असता त्याच्या जवळ फोन,बनावट ओळखपञ,बनावट शिक्के,बनावट नियुक्ती आदेश,वनविभागाचा बनावट लोगो,गणवेश ,हजरी रजिस्टर,आसे साहित्य मिळाले या वेळी वन परीक्षेञ अधिकारी डी डी बोरसे, तानाजी भुजबळ,एम एम राठोड,ए ई सोनवने,एम बी पाटील,आर के दोंड,अजय वाघ,बी जे सुर्यवंशी,सुरेंद्र शिरसाठ,अजय वाघ,चंद्रकांत मांगेपाड, आदींनी काम बघितले नंतर या तोतयांना नांदगांव पोलीस यांच्या ताब्यात दिले.

या तोतयाकडुन. ग्यानेश्वर इपर कासारी,सचिन भागवत बेजगांव, सखाराम भुसनर मोहेगांव,आदीकडुन १७ हजार रुपये उकळले शिवाय नोकरीची आर्डर मिळाल्यावर ५० हजार रु घेणार होता त्या आगोदरच तोतया वनविभागाच्या जाळ्यात आडकला तसेच तोतयाने एका मुलीला वनविभागाचा गणवेश घालुन नोकरीचे अमिष दाखवून तिच्याशी लग्नाची बोलणी केली होती.