सोन्याबाई ठक्करवाड माध्यमिक विद्यालयात मास्क, सोशल डिस्टंन्स राखून भरली शाळा

32

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

बिलोली(दि.5डिसेंबर):- तालुक्यातील हुनगुंदा येथील सोन्याबाई ठक्करवाड माध्यमिक विद्यालय दि.2 डिसेंबर रोजी मास्क, सोशल डिस्टंन्स राखून पहिल्याच दिवशी 9 वि व 10 वीचे 70 टक्के विद्यार्थी उपस्थीत होते.महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाने नांदेड जिल्ह्यात 2 डिसेंबर पासून 9 वी ते 12 विचे वर्ग सम व विषम पध्दतीने एक दिवस आड एक दिवस वर्ग सुरु करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहे.

त्याच अनुषंगाने हुनगुंदा येथील सोन्याबाई ठक्करवाड माध्यमिक विद्यालयात एक दिवस अगोदर वर्ग खोल्याचे स्वच्छता व सँनिटायझेशन करण्यात आले. तर 2 डिसेंबर रोजी 9 वी व 10 विचे 70 पक्के विद्यार्थी उपस्थित होते. त्या अगोदर पालकांचे लेखी समती पत्र घेण्यात आले. व तसेच मास्क, सोशल डिस्टंन्सचे काटेकोरपणे पालन करण्याचे सुचना दिले होते.