करमाळा तालुक्यात जनता भयभीत बिबट्या चा सुळसुळाट

34

✒️नागेश खुपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

सोलापूर(दि.5डिसेंबर):-करमाळा तालुक्यातील फुंदेवाडी(लिंबेवाडी) येथे बिबट्यासदृश्य पाण्याने कल्याण दासा फुंदे वय 45 यांना पकडून ओढत नेले. मग रात्र झाली तरी कल्याण शेतातून घरी परत येत नसल्याने घरच्या मंडळींनी शोध घेतला असता शेतात कल्याणच्या त्यांच्या चपला, चष्मा, रक्त सांडलेले ठिकाणी पाहून सर्वानाच हादरा बसला.मग पोलिसांनी गावक-यांच्या मदतीने शोध घेतला असता कल्याणचे मुंडके नसलेला मृतदेह शेतात झुडपात आढळून आला.

रात्री उशीरा कल्याणचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात आणला आहे.बिबटयाच्या दहशतीमुळे संपुर्ण परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. रात्रीची लाईट आणि शेतात पिकांना पाणी देणे हे काम आता बिबट्याच्या दहशतीने जीवघेणे झाले आहे. करमाळा तालुक्यात सर्वत्रच बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.