कोविड-१९ कालावधीत प्रभावी अध्यापन केल्यामुळे करमाळा पंचायत समितीच्या वतीने श्री. अतुल खुपसे (सर) यांना आदर्श शिक्षक देवुन सन्मान

29

🔹शाळा बंद शिक्षण सुरु

✒️नागेश खुपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

सोलापूर(दि.6डिसेंबर):- कोविड-१९ मुळे महाराष्ट्रातील सर्व शाळा बंद आहेत पण संकटाना घाबरून थांबेल तो महाराष्ट्र कसला त्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने आॅनलाईन पध्दतीने शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. ही शिक्षण पध्दती आपल्यासाठी नवीन असल्याने सुरवातीला यामध्ये अडचणी आल्या पण या अडचणींवर मात करत श्री. अतुल खुपसे (सर) सारखां जिद्दी शिक्षकांनी ही पद्धती अवलंबलीच नाही.

तर ती यशस्वीपणे राबवलीसुध्दा त्याच कार्याचे फळ म्हणून आज दि. -५ रोजी शालेय शिक्षण समीतीचे सदस्य श्री. महादेव (आबा) रोकडे व केंद्र प्रमुख श्री. तोरमल गुरुजी यांच्या उपस्थितीत करमाळा तालुका पंचायत समिती तर्फे प्रभावी शिक्षक म्हणून प्रमाणात देवुन सन्मान करण्यात आला.