टेम्पो चालकाने वाहतूक पोलिसांवर गाडी चालविली

    40

    ?वाहतूक पोलीसाचा जागीच मृत्यू

    ✒️नागेश खुपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

    सोलापूर(दि.9डिसेंबर):-पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वरवडे येथील टोल नाक्याजवळ वाहतूक पोलिसाने टेम्पो चालकाला टेम्पो थांबवण्यासाठी हात केल्याने चालकाने गाडीच अंगावर घातल्याची धक्कादायक घटना घडली. यात पोलीस नाईक सागर चौबे या वाहतूक पोलिसाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.

    सविस्तर वृत्त असे की, आरोपी चालक नवनाथ शिवाजी गुट्टे हा औषधांचे साहित्य आयशर टेम्पोतून (क्र.MH.04. HD. 01 70) घेऊन हैदराबादहून मुंबईकडे जात होता. यावेळी सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर वरवडे येथील टोल नाक्याजवळ पोलीस नाईक सागर चौबे यांनी टेम्पो चालकाला टेम्पो थांबवण्याचा इशारा केला. मात्र, टेम्पो चालकाने वाहन थेट चौबे याच्या अंगावर घातले. यात चौबे यांचा जागीच मृत्यू झाला.

    अपघातानंतर आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान अपघात घडलेल्या ठिकाणीच उपस्थित असलेल्या जमावाने चालकाला पकडण्यास पोलिसांची मदत केली. चालक नवनाथ शिवाजी गुट्टे याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला इतर पोलिसांनी टेभूर्णी पोलीस स्टेशनला आणले आहे. या घटनेमुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.