स्मार्ट प्रकल्पांतर्गत अर्ज करण्यास दिनांक ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

36

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.14डिसेंबर):- जागतीक बँकेच्या अर्थसहाय्यातुन राज्यात राबविण्यात येत असलेल्या मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामिण परिवर्तन प्रकल्पांतर्गत समुदाय आधारीत संस्था आणि संस्थात्मक खरेदीदार यांचेकडून अर्ज मागविण्याची अंतिम मुदतीस आता ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.अर्ज करण्याची अंतिम मुदत यापुर्वी १५ डिसेंबर २०२० होती. या प्रकल्पातुन सर्वसमावेशक आणि स्पर्धाक्षम मुल्यसाखळ्या विकसित करावयाचे उदिष्ट आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या समुदाय आधारीत संस्थांनी मुल्यसाखळी विकासाचे उपप्रकल्प ऑनलाईन सादर करावयाचे आहेत.

यास चांगला प्रतिसाद मिळालेला असून आतापर्यंत सुमारे एक हजार अर्ज प्राप्त झालेले आहेत. तथापि शेतकऱ्यांची आणि खरेदीदार संस्थांची मागणी लक्षात घेवून अर्ज करण्यास दिनांक ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. याबाबत अधिक माहितीसाठी www.smart-mh.org या संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी उदय पाटील यांनी केले आहे.