द रॉयल किंग & क्वीन महाराष्ट्र चे 26 डिसेंबर ला ऑडिशन

33

✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पुणे(दि.16डिसेंबर):- द रॉयल प्रेझेंट च्या वतीने पुणे येथे शनिवार दि.26 डिसेंबर ला द रॉयल किंग & क्वीन महाराष्ट्र या शो चे ऑडिशन घेण्यात येणार असून ऑडिशन मधून मॉडेल्स ची निवड करण्यात येणार असल्याची माहिती यशस्वी आयोजक नितिन झगरे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

या शो चे परिक्षक म्हणून मिसेस युनिव्हर्स सविता एस के,मिसेस युनिव्हर्स प्रचिती पुंडे,मिस महाराष्ट्र नेहा जाधव काम बघणार आहे.रॉयल च्या वतीने प्रथमच ऑडिशन चे आयोजन करण्यात आले आहे अन हा भव्य दिव्य शो फेब्रुवारी महिन्यात आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती ब्रँडिंग पार्टनर टन्स ग्रुप चे मैनेजिंग डायरेक्टर तन्वीर अहमद सर यांनी सांगितले.

या ऑडिशन साठी जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन सपोर्टींग पार्टनर वर्षाताई ढमढेरे,ज्योतीताई लाड,नमिता पाटील,ब्रँड अंबेसिडर रेणुका ठाणगे, सभापती आशिष रजपूत सर यांनी केले.ऑडिशन हे पुणे टन्स युनिव्हर्स ,110, दुसरा मजला, भिवंडी दरबार हॉटेल च्या समोर एम.जी रोड पुणे कंम्प येथे होणार आहे.सकाळी 10 ते 2 या वेळेत होणार आहे. 9766873917 या नंबर वर संपर्क साधावा.