शेतीवर आधारीत उद्योग प्रशिक्षण मिळणार ऑनलाईन

32

✒️नरेश निकुरे(कार्यकारी संपादक)मो:-9823594805

चंद्रपूर(दि.17डिसेंबर):-महाराष्ट्र उद्योजकता विकास केन्द्र ही उद्योग संचालनालयाअंतर्गत कार्यरत व महाराष्ट्र शासन पुरस्कृत स्वायत प्रशिक्षण संस्था असून या संस्थेचा मुख्य उद्देश विविध प्रकारचे प्रशिक्षण आयोजित करून जास्तीत जास्त लोकाना स्वत:चा उद्योग, व्यवसाय सूरू करणेकरिता प्रेरित करणे व उद्योजकतेला पुरक असे वातावरण निर्मित करणे हा आहे. महाराष्ट्र उद्योजकता विकास केन्द्र, चंद्रपूर द्वारे 10 वी पास व १८ वर्षे पूर्ण असलेल्या युवक युवतीकरीता 29 डिसेंबर 2020 ते 8 जानेवारी 2021 या कालावधीमध्ये शेतीवर आधारीत उद्योग प्रशिक्षण कार्यक्रम ऑनलाईन आयोजित करण्यात आला आहे.

सदर ऑनलाईन कार्याशाळेत शेतीवर आधारीत विविध उद्योगसंधी, अन्न प्रक्रियावर आधारीत उद्योगसंधी, डिजीटल मार्केटिंग,ॲग्रीकल्चर प्रॉडक्ट पॅकेजिंग, दुग्ध व्यवसाय व दुग्ध प्रक्रिया उद्योगातील उद्योगसंधी, फळ प्रक्रियातील उद्योगसंधी, पशुसंवर्धनावर आधारीत उद्योगसंधी, उद्योजकता व उद्योजकीय प्रेरणा प्रशिक्षण, संभाषण कौशल्य, संकलण व आकलन कौशल्य, सर्जनशीलता, नाविन्यपूर्णता व समस्या निराकारण, संघटनाचे प्रकार, शासकीय कार्यालयातील विविध योजना, बाजारपेठ पाहणी, साधने व तंत्रज्ञान, उत्पादन निवड, उद्योगासाठी लागणारे परवाने, नाहरकत प्रमाणपत्र व नोंदणी, जीएसटी नोंदणी, उद्योगाचे व्यवस्थापन, विपणन व्यवस्थापन, उत्पादन व कच्चा माल यांचे व्यवस्थापन, उत्पादन, नियंत्रण व नियोजन, आर्थिक व्यवस्थापन, खेळते भांडवल व्यवस्थापन, प्रकल्प अहवाल, ऑनलाईन कर्ज प्रक्रिया व कृती आराखडा तयार करुन अंमलबजावणी करणे इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

सदर प्रशिक्षणासाठी प्रवेश घेण्याकरीता इच्छुक युवक युवतीनी www.mced.co.in या वेबसाईटवर 28 डिसेबर २०२० पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी के व्ही. राठोड, मो.न. ९४०३०७८७७३. ०७७२-७४१ व कार्यक्रम आयोजक मिलिंद कुंभारे, मो. न. ९०११६६७७१७, कार्यक्रम आयोजिका दिपाली जाजर्ले मो. न. ९८६०६००३०१ याच्याशी संपर्क साधावा, असे प्रकल्प अधिकारी के. व्ही. राठोड यांनी कळविले आहे.