जुनी पेन्शन योजना अधिसूचना रद्द झाल्याने शिक्षकांत आनंद

27

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

बिलोली(दि.20डिसेंबर):-जुनी पेन्शन योजना लागू होण्यास अडथळा असणारी १० जुलैची अधिसूचना रद्द करण्याच्या निर्णयावर शिक्षक व पदवीधर आमदारांच्या बैठकीत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्वाक्षरी केली.यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.१० जुलै २०२० रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने महाराष्ट्र खासगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती)नियमावली १९८१ मधील सेवाशर्तीमध्ये बदल सुचवणारी अधिसूचना जारी केली होती.या अधिसुचनेत सुचवल्याप्रमाणे बदल झाल्यास राज्यातील १ नोव्हेंबर २००५ पुर्वी नियुक्त हजारो मुख्याध्यापक,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना मिळण्याचा अधिकार मिळणार आहे.

या विरोधात अनेकदा आंदोलने झाली.राज्यभरातुन हजारो हरकती नोंदविल्या.आंदोलन करून स्थानिक प्रशासनाला निवेदने दिली होती.विधी व न्याय खात्याने ही अधिसूचना रद्द करण्यास हरकत नसल्याचे कळवताच १० जुलै ची अधिसूचना रद्द करण्यात आली आहे.त्यामुळे हजारो शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचा-यांना जुनी पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.त्यामुळे हजारो शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.