चंद्रपूर जिल्ह्यात (दि 24डिसेंबर) रोजी 24 तासात 66 कोरोना कोरोनामुक्त 43 नव्याने कोरोना पॉझिटिव्ह

30

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.24डिसेंबर):-जिल्ह्यात मागील 24 तासात 66 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 43 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 22 हजार 21 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 21 हजार 44 झाली आहे.

सध्या 621 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 66 हजार 999 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 42 हजार 845 नमुने निगेटीव्ह आलेआहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 356 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 329, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 16, यवतमाळ सात, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 43 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 11, चंद्रपूर तालुका सात, भद्रावती चार, ब्रम्हपुरी 11, नागभीड दोन, सिंदेवाही एक, मूल एक, चिमुर दोन, वरोरा तीन व इतर ठिकाणच्या एका रुग्णाचा समावेश आहे.नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.