गंगाखेड शहरात सर्पमित्र चेतन लांढे व किरण भालेराव यांचे होत आहे कौतुक

35
✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.24डिसेंबर):-साप हा शेतकऱ्याचा मित्र समजला जाणारा एक सरपटणारा प्राणी आहे. अशा या प्राण्याला जीवनदान देण्याचे काम गंगाखेड शहरातील जिगरबाज व्यक्तिमत्व चेतन लांढे व किरण भालेराव हे करत आहेत. त्यांच्या कामाबद्दल त्यांच्या शहरात त्यांचे कौतुक केले जात आहे.

गंगाखेड परिसरात सर्पमित्र म्हणून त्यांची ओळख या दोघांनी ओळख निर्माण केली आहे.राञी बेराञी केव्हा ही फोन आला की तात्काळ त्याठीकाणी पोहचण्याचे काम हे करत आसतात.
यामध्ये गजानन साखरे, चैतन लांडगे व किरण भालेराव यांनी आज पर्यंत दोनशे ते अडीशे सापाला जीवदान देण्याचे काम केले आहे.
शहरात लोकवस्तीच्या ठिकाणी अचानक निघालेल्या सापाला नागरिक घाबरून काठीने मारत असतात , पण सध्या गंगाखेड तालुक्याच्या परिसरात साप निघाला तर स्थानिक नागरिक सर्पमित्र चैतन लांडे, किरण भालेराव व गजानन साखरे यांना फोन करून बोलवत असतात. लोकवस्तीतील साप पकडून सुरक्षित ठिकाणी नेऊन सापाला जीवनदान देण्याचे काम हे सर्पमित्र करत आहेत त्यांच्या या धाडसी पणाला सध्या शहरात कौतुक केले.