आर सी एज्युकेशन नाशिक व दिशोत्तमा प्रकाशन कार्यालयास दिव्यांग शक्ती वृत्तपत्राचे मुख्य संपादक मा. श्री मनोज नगर नाईक यांची भेट

27

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)मो:-9403277887

नाशिक(दि.31डिसेंबर):-नाशिक (31 डिसेंबर)- दिव्यांग शक्ती वृत्तपत्राचे मुख्य संपादक मा. श्री मनोज नगर नाईक साहेब यांनी नाशिक येथे आर सी एज्युकेशन नाशिक व दिशोत्तमा प्रकाशन कार्यालयास आपल्या धावपळीच्या कार्यक्रमा दरम्यान सदिच्छा भेट दिली,

यावेळी आर सी एज्युकेशन नाशिक चे संचालक श्री रविंद्र पाटील सर, दिव्यांग कल्याण संघटना नाशिक चे अध्यक्ष श्री बबलु मिर्झा, प्रहार अपंग संघटना नाशिक चे शहराध्यक्ष श्री ललित पवार यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले,

दिव्यांग व्यक्तीना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार व समाज कमी पडत असल्याची खंत श्री नगरनाईक यांनी व्यक्त केली, दिव्यांगांनी आत्मनिर्भर होऊन समाजापुढे आदर्श निर्माण करावा असे ही त्यांनी सांगितले.

तसेच दिव्यांग बांधवांचा आवाज सा.दिव्यांग शक्ती च्या वार्ताकनाचे संकलना दरम्यान प्रा. रविद्र पाटिल सर हे दिव्यांग बांधवांचा वाढदिवस आपल्या स्वखर्चाने साजरा करतात. मग तो परिचीत असो वा नसो , दिव्यांगानस वाढदिवस निमित्ताने शुभेच्छा देतात व वाढदिवस कायम लक्षात राहिल याप्रमाणे साजरा करतात, पाटिल सर करित असलेल्या कार्यापासुन सर्व दिव्यांग हितचिंतकांनी प्रेरणा घेऊन पुढील वाटचाल करावी असे सांगितले. यावेळी अनेक दिव्यांग ऊपस्थित होत