बालाजी तांडुरवार यांचे निधन

30

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो.नं.9970631332

कुंडलवाडी(दि.8जानेवारी):-शहरातील प्रतिष्ठित व्यापारी बालाजी व्यंकटी तांडुरवार (वय ५७) यांचे अल्पशा आजाराने दि.७ जानेवारी रोजी दुःखद निधन झाले.

त्यांच्या पार्थिवावर येथील स्मशानभूमीत सांयकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी,सुना,नातु,नातवंडे असा परिवार आहे. ते येथील एसबीआय बँकेतील कंत्राटी कर्मचारी गंगाधर तांडुरवार यांचे वडील होत.