सम्यक बौद्ध विहार येथे जागतिक धम्मध्वज दिन साजरा

23

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

उमरखेड(दि.8जानेवारी):- येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वार्डातील सम्यक बौद्ध विहारामध्ये दि.८ जानेवारी रोजी “जागतिक धम्मध्वज दिवस “साजरा करण्यात आला.

पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण नगरसेविका हिराबाई दिवेकर व भदंत क्रिती बोध्दी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उपस्थित (शांतीदूत समिती अध्यक्ष) कुमार केंद्रेकर यांनी पंचशील ध्वजाचे महत्व सर्वांना समजावून सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल दिवेकर यांनी केले.
यावेळी शांताबाई दिवेकर, जिजाबाई दिवेकर, जानकाबाई इंगोले,यशोदाबाई दिवेकर, येशोधरा धबाले,सुभाबाई पाईकराव भारताबई दिवेकर, ज्योतिताई इंगोले, शुभांगी इंगोले, मारोती दिवेकर, राजू दिवेकर,भीमराव श्रवले, माही धुळेकर, बुद्धभूषण इंगोले, धम्मा आठवले सिध्दार्थ दिवेकर व रमामाता महिला मंडळ, शांतीदुत समिती, भीम टायगर सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.