डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ब्रह्मपुरी येथे प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार

42

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.13जानेवारी):-गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली
ने नुकतेच जाहीर केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये स्थानिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी येथील पल्लवी नंदू शिंगाडे बी. ए. संगीत या विषयात सर्वाधिक गुण प्राप्त कर तसेच एम. ए.आंबेडकर विचारधारा या विषयात प्रशांत चरणदास डांगे, एम. ए समाजशास्त्र विषयात पुनम मेघराज राहाटे, एम. ए. पाली व प्राकृत विषयात शीतल हिरामण शेंडे, एम. फिल इंग्लिश विषयात सुकेशनी अनिल फुलझेले यांनी विद्यापीठातून सर्वाधिक गुण प्राप्त केले.

या सर्व प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. डॉ. देवेश कांबळे यांच्या हस्ते पार पडला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आझिझुल हक यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्थेच्या सदस्या प्रा. डॉ. स्निग्धा कांबळे उपस्थित होत्या. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक तथा कर्मचारी यांनी प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्याचे अभिनदन केले आहे.
गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात या सर्व प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात होणार आहे.