भंडारा दुर्घटनेतील पीडित कुटुंबांना पंतप्रधान निधीतून दोन लाखांची मदत जाहीर

29

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

भंडारा(दि.13जानेवारी):- जिल्हा सामान्य रुग्णालय दुर्घटना प्रकरणी पीडित कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे. तर या घटनेत जे गंभीररित्या जखमी झाले आहेत.

त्यांना 50,000 रुपयांची मदत देण्यात येणार आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून ही मदत दिली जाणार आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता कक्षात शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास आग लागल्याने दहा चिमुकल्यांचा मृत्यू झाला होता.

तेथील 17 नवजात बालकांपैकी सात बालकांना वाचवण्यात यश आले. मृत बालके एक ते तीन महिने वयाची होती. रुग्णालय परिसरात मृत बालकांच्या माता टाहो फोडत होत्या. त्यांच्या आक्रोशाचे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते. या दुर्घटनेमुळे राज्यासह अवघा देश हळहळला होता.