बीएसएनएल दुरध्वनीवरून मोबाईल संपर्क प्रक्रियेत फेरबदल

115

🔹15 जानेवारीनंतर मोबाईलवर संपर्कासाठी शुन्य लावावा लागणार

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.15जानेवारी):^ भारत संचार निगम (बीएसएनएल) च्या दुरध्वनीवरून कोणत्याही कंपनीच्या भ्रमणध्वनीवर (मोबाईल) संपर्क करण्यासाठी 15 जानेवारी 2021 नंतर नंबर डायल करण्यापुर्वी शून्य लावून मग नंतर पुर्ण संपर्क क्रमांक डायल करावा लागणार आहे.

जर मोबाईल 94********* असेल तर यानंबर वर संपर्क करण्या अगोदर 094******** डायल करावे लागेल, असे चंद्रपूर येथील भारत संचार निगम लिमिटेडचे महाप्रबंधक यांनी कळविले आहे.