शिवतेज शिवपुत्र गस्ती यांची “मास्टर इन इंटरनॅशनल बिझनेस” या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी युनीव्हर्सिटी आॕफ न्यू साऊथ वेल्स (आॕस्ट्रेलिया-सिडनी) विद्यापीठामध्ये निवड

28

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)मो:-9561905573

कोल्हापूर(दि.17जानेवारी):- छ.शाहू काॕलनी,कागल येथील शिवतेज शिवपुत्र गस्ती यांची “मास्टर इन इंटरनॅशनल बिझनेस” या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी युनीव्हर्सिटी आॕफ न्यू साऊथ वेल्स (आॕस्ट्रेलिया-सिडनी) विद्यापीठामध्ये निवड झालेबद्दल मा हनीफ मुश्रीफ यांनी त्याला पुष्पगुच्छ देवून त्यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालिस शुभेच्छा दिल्या.

यावेळी कागल शहर राष्ट्रवादी काॕग्रेस अध्यक्ष संजय चितारी,कागल शहर राष्ट्रवादी काॕग्रेस अंल्पसंख्यांक अध्यक्ष पंकज खलिफ,महादेव भोकटे,निशांत जाधव,मुस्ताक मुल्ला,आरीफ नायकवडी आदी मान्यवर उपस्थित होते.