येवला येथे कला व वाणिज्य महाविद्याल खुली गायन स्पर्धेचे आयोजन

35

✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

नाशिक(दि.20जानेवारी):-येवला येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयात महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या अध्यक्ष, महिलारत्न , माजी आरोग्यमंत्री श्रीमती पुष्पाताई हिरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आंतरमहाविद्यालयीन खुल्या गीत गायन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. त्यात येवला येथील एन्झो – केम महाविद्यालयाचा विद्यार्थी केतन केशव काळे याने प्रथम क्रमांक मिळवत बाजी मारली. तर दुसरा क्रमांक येवल्याच्याच कला व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. स्वप्नाली ज्ञानेश्वर जाधव हिने पटकावला.

तृतीय क्रमांकाचे बक्षीस कु. जयश्री उराडे. व चि. शिवप्रसाद खैरे याना विभागून देण्यात आले. तर उतेजनार्थ पारितोषिक कु. रेश्मा कऱ्हेकर यांनी पटकावला. स्पर्धेत संगीत साथसंगत चि. गणेश मधुकर काबरा यांनी केली. तर डॉ. मनीषा गायकवाड व प्रा. धनंजय पेहरकर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. विजेत्यांना महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस. डी. गायकवाड यांच्या असते रोख परितोषिके, अनुक्रमे प्रथम क्रमांकासाठी रु. १०००/- , द्वितीय क्रमांकासाठी रु. ७००/-, व तृतीय क्रमांकासाठी रु. ५००/- तसेच महाविद्यालयाचे नियतकालक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ. धनराज धनगर यांनी केले. यावेळी कनिष्ठ व वरिष्ठ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.