गडचिरोली जिल्ह्यात आज (20 जानेवारी) 9 नवीन कोरोना बाधित तर 20 कोरोनामुक्त

26

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

गडचिरोली(दि.20जानेवारी):-आज जिल्हयात 9 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 20 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9294 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9093 वर पोहचली. तसेच सद्या 96 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 105 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.84 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 1.03 टक्के तर मृत्यू दर 1.13 टक्के झाला.

नवीन 9 बाधितांमध्ये गडचिरोली 4, अहेरी 0, आरमोरी 0, भामरागड 0, चामोर्शी 0, धानोरा 3, एटापल्ली 0, कोरची 0, कुरखेडा 0, मुलचेरा 2, सिरोंचा 0, व वडसा येथील 0 जणांचा समावेश आहे. आज कोरोनामुक्त झालेल्या 20 रूग्णांमध्ये गडचिरोली 3, अहेरी 0, आरमोरी 0, भामरागड 0, चामोर्शी 0, धानोरा 0, एटापल्ली 0, मुलचेरा 0, सिरोंचा 5, कोरची 12, कुरखेडा 0, व वडसा मधील 0 जणाचा समावेश आहे.

नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील रामपुरी वार्ड 2, श्रीकृष्णनगर 1, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये 0, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये 0, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये 0, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये 0, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये सीआरपीएफ 1, जेएसपीएम कॉलेज 2, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये 0, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये 0, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 0, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये रेंगेवाही 2, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 0, व वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 0, तर इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये 1 जणाचा समावेश आहे.