सातारा जिल्ह्यतील वाई तालुक्यात पूजा गणाई यांचे लाक्षणिक उपोषण

33

✒️नितीन राजे(खटाव,जिल्हा सातारा- विशेष प्रतिनिधी)मो:-9822800812

सातारा(दि.20जानेवारी):- भेदाभेद मुक्त मानव जाणीव जागृती निर्माण करण्याकरता विद्यार्थी भारती राज्याध्यक्ष पूजा गणाई 26 जाने. ते 30 जाने. पर्यन्त लाक्षणिक उपोषण करणार आहेत.
आजकाल संस्कृतीच्या नावाने सगळ्याच जाति धर्मात तालिबाणींचा वारसा चालवणारे कट्टर लोक तयार केले जात आहेत व येणाऱ्या काळात जाती जमाती धर्म भाषावादी लोक यादवी करतील व एकमेकांचे मुडदे पाडतील व एकमेकांना नष्ट करतील असे विद्यार्थी भारती राज्याध्यक्ष पूजा गणाई यांनी यांनी विद्यार्थी भारताच्या मिटिंग मध्ये पाच दिवसीय उपोषणाचा निर्णय जाहीर करताना आपले मत मांडताना आपले हे उपोषण सरकार विरोधात नसून जनतेच्या एकतेसाठी युवकांनी पुढाकार घ्यावा यासाठी असल्याचे मत मांडले.

विद्यार्थी भारतीच्या राष्ट्रीय अध्यक्षा यांनी मिटिंगचे अध्यक्ष या नात्याने विद्यार्थी भारती राज्याध्यक्ष पूजा जया गणाई यांचे कौतुक करून पूजाच्या उपोषणामुळे तरुण वर्गात विशेषतः युवतीं मध्ये मोठ्या प्रमाणात जागृती येईल अशी आशा व्यक्त केली व हे उपोषण भारतातील युवकांमध्ये चैतन्य निर्माण करेल अशी खात्री व्यक्त केली .

जात वर्ग लिंग वर्ण वंश भाषा धर्मातील भेदाभेद निर्मूलनासाठी तरुणाई पुढे आली पाहिजे व बलशाली भारतासाठी त्यांना संघटित केले पाहिजे ,सामाजिक न्यायचा विचारांचे वादळ महाराष्ट्रात घोंघावले पाहिजे अशी आशा कार्यवाह आरती गुप्ता यांनी व्यक्त केली.पूजाचे हे उपोषण वाई येथील मैत्रकुल येथे गणतंत्र दिवस 26 जानेवारी ते हुतात्मा दिवस 30 जाने पर्यन्त होईल व या निमित्त विविध पुरस्कार व स्पर्धा यांचे आयोजन करण्यात येईल अशी माहिती कार्यक्रम प्रमुख साक्षी भोईर यांनी दिली.

य वेळी या विद्यार्थी भारती व मैत्रकुल संस्थापक् किशोर जगताप यांनी पूजा व विद्यार्थीच्या कार्यकर्त्यांचे कौतुक करून पूजा गांधी ,विनोबा भावे ,जयप्रकाश नारायण , बाबा आमटे यांचा वारसा चालवत असल्याने तिचा अभिमान वाटतो हे सांगून ज्या देशात , भेदाभेदासाठी पूजा सारखी युवा पुढे येते तो देश गुलाम कधीच होणार नाही हे सांगून महाराष्ट्र जिवंत ठेवायचे काम विद्यार्थी भारती करत असल्याचे मत मांडले.या वेळी आजी माजी विद्यार्थी भारती च्या उपस्थित कार्यकर्त्यांची भाषणे झाली याची माहिती देऊन उपोषणास उपस्थित राहण्याचे आवाहन विद्यार्थी भरती राज्य प्रवक्ता यांनी काढलेल्या पत्रकात केले आहे .