पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल होऊ देणार नाही-डी.टी.आंबेगावे

    41

    ?प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची नांदेड जिल्हा कार्यकारिणी जाहिर

    ✒️माधव शिंदें(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

    नांदेड(दि.21जानेवारी):- प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची नांदेड जिल्हा कार्यकारिणी दि.२० जानेवारी २०२१ रोजी जाहिर करण्यात आली. या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या पत्रकारांवर कदापिही खोटे गुन्हे दाखल होऊ देणार नसल्याचे भाष्य केले तसेच संघाचे संपादक व पत्रकारांचे कुटुंब यांचे कल्याणासाठी विविध योजना राबवून सक्षम पत्रकार ही संकल्पना संघाने हाती घेतल्याचे सांगितले.

    याप्रसंगी राज्य महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे, यवतमाळ जिल्हाध्यक्ष अनिल राठोड, मुखेड तालुकाध्यक्ष भारत सोनकांबळे यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या उल्लेखनिय कार्याची माहिती दिली. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड यांनी केले तर आभार जिल्हा कार्याध्यक्ष विशाल पवार यांनी मानले यावेळी संघाचे पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते.