ग्रामपंचायत सदस्यपदी निवड झालेबद्दल पांडुरंग वीरकर यांचा म्हसवड फोटोग्राफर असोसिएशनकडून सत्कार

    47
    ✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड-माण)मो:-9075686100

    म्हसवड(दि.23जानेवारी):-महाष्ट्रात ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या त्याचे निकाल पण लागले सर्वानी मिरवणूक काढून आपल्या अंगावर गुलाल घेतला पण यात म्हसवड फोटोग्राफर असोसिएशनचे सदस्य माजी पदाधिकारी अष्टपैलू व्यक्तिमत्व श्री.पांडुरंग विरकर यांनी आपला फोटोग्राफीत ठसा उमटवला पण स्वस्थ बसेल तो फोटोग्राफर कसला त्यांनी स्वताचा पांडाचा ढाबा चालू केला.

    त्यातपण मोठे यश मिळविले फोटोग्राफीचा व्यवसाय करत असताना अनेक राजकीय,व्यावसायिक लोकांशी त्याचा संबंध आला त्यातूनच त्यांना ऊर्जा मिळाली आणि त्यांनी आपल्या कोंढारकी या मूळ गावी होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरला आणि मोठ्या फरकाने विजयी झाले.
    त्याचे अभिनंदन करणेसाठी म्हसवड फोटोग्राफर असोसिएशनने एक छोटेखानी कार्यक्रम घेऊन त्याचा सत्कार केला आपल्या बांधवाला मिळालेला विजय हा आपलाच विजय समजून त्या आनंदात सर्वजण सहभागी झाले.यावेळी माजी अध्यक्ष गजकुमार ढोले आणि उपाध्यक्ष राहुल खटावकर आणि सर्व फोटोग्राफर बंधू यांनी अभिनंदन केले