किसान एकता मोर्चा गझिपुर बॉर्डर येथे मोर्चाला हिंगणघाट येथील अनिल जवादे यांनी केले संबोधित

25

✒️इकबाल पैलवान(विशेष प्रतिनिधी)मो:-9923451841

दिल्ली(दि.24जानेवारी):- दोन महिन्यांपासून देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला समर्थन देण्याकरिता अनिल जवादे 20 तरुण शेतकरी पुत्र आणि 10 बौद्ध भिक्षु यांना घेऊन गाझिपुर बॉर्डर येथे पोहचले. अनिल जवादे यांनी आपल्या संबोधनात संपूर्ण शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या महाराष्ट्रात सुद्धा दररोज शेतकरी आत्महत्या होत आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण देशातच अतिशय गंभीर अवस्था आहे. आज संपूर्ण देशातील शेतकरी जागा झालेला आहे.

आता हे शेतकऱ्यांचे आंदोलन मागे घ्यायचे नाही. प्रथमच संपूर्ण देशातील शेतकरी या आंदोलनात सामील झालेला आहे. जोपर्यंत तिन्ही शेतकरी विरोधी कायदे रद्द होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहील. आता आम्ही शेतकरी मागे येणार नाही ” दिल्ली ‘तेरी छाती पर लहू के निशाण हैl घमंड मे सरकार है और थंड मे किसान है l” या गर्जनेसह शेतकरी आंदोलनात महाराष्ट्रातील शेतकरी सुद्धा सामील झाले. महेश माकडे दिनेश वाघ बि एस पाटिल दिलीप पाटील गजानन मावळे अजय मुळे संजय ढोबले चंद्रकांत भोयर संदीप जनेकर स्वप्निल मस्के वैतागे खेचे नादुरकर इत्यादी शेतकरी पुत्र उपस्थित झाले.